मुंबई : बॉलिवूडची गायिका सुनिधी चौहान (Sunidhi Chauhan) ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. सुनिधी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सुनिधीचे लाखो चाहते आहेत. सुनिधीच्या शोला आपल्याला नेहमीच चाहत्यांची गर्दी असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, यावेळी सुनिधी तिच्या शोमुळे किंवा आगामी गाण्यामुळे नाही तर एका दुसऱ्याच कारणामुळे चर्चेत आहे. सुनिधी विरोधात शिवसेनेचे काही कार्यकर्ते आता चांगलेच आक्रमक झालेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुनिधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. सुनिधीचा आगामी लाईव्ह कार्यक्रम होणार असून त्याचे स्पॉन्सर पाकिस्तानी असल्याचा आरोप शिवसेनेच्या वाहतूक शाखेने केला आहे. 


आणखी वाचा : Divorce नंतरही समांथाला विसरू शकला नाही नागा चैतन्य, जपून ठेवलीये शेवटची निशाणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सुनिधीचा हा आगामी कार्यक्रम पाकिस्तान स्पॉन्सर असून तो होऊ नये, यासाठी त्यांनी तक्रार दाखल केली असून शिवसेनेचा ठाम विरोध असणार आहे असे शिव वाहतूक सेना कार्यकारी प्रमुख गफ्फार शेख यांनी म्हटले आहे. याविषयी बोलताना शेख म्हणाले, सुनिधीनं पाकिस्तानद्वारा स्पॉन्सर कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याला आमचा विरोध आहे. कारण पाकिस्तान एक असा देश आहे. जो कायम भारत विरोधी आहे. जेवढ्या या ठिकाणी दंगली झाल्या, जेवढे बॉम्बस्फोट झाले या सगळ्यात पाकिस्तानचा हात होता. सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे आपल्या देशाच्या बॉर्डवर जे जवान लढतात त्यातील काही जवान काही काळापूर्वी शहीद झाले. असं सगळं असताना सुनिधी पाकिस्तानकडून स्पॉन्सरशिप घेऊन भारतात शो करते असं म्हणतं त्यांनी कार्यक्रमाचे पॅम्प्लेटही दाखवले.  सुनिधीचा हा शो 13 ऑगस्ट शनिवारी दुबईत होणार आहे. 


णखी वाचा : Rakshabandhan Video: भाऊ नाही म्हणून 'ही' अभिनेत्री रिक्षावाल्यांना बांधतेय राखी


 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : Celebrity Phobia : कोणाला पंख्याची तर कोणाला वाटते फळांची भीती; पाहा सेलिब्रिटींचे चक्रावणार Phobia


 


बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरणेनुसार शिवसेनेनं याआधीही पाकिस्तानचा विरोध केला होता. यावेळी ओशिवारा पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याविषयी गफ्फार शेख म्हणाले, आम्ही ओशिवारा पोलीस ठाण्यात येण्याचं कारण म्हणजे सुनिधी अंधेरीत राहतात. त्यामुळे स्थानिक पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे, आमच्या पूर्ण वाहतूक सेनेचा या कार्यक्रमाला विरोध असेल, पोलिसांनी त्यांना बोलवून घेऊन समजावले जाईल,असे आश्वासन आम्हाला देण्यात आले आहे. तसेच ज्या चॅनल वरती हा प्रोग्राम लाईव्ह प्रक्षेपित होणार आहे, त्यांनाही आम्ही मेल करणार आहोत की हा प्रोग्राम दाखवू नका, दाखवल्यास शिवसेना यालाही कडाडून विरोध करेल.