धक्कादायक : अरुंधतीचा गंभीर अपघात; व्हेंटिलेटरवर असल्याची बहिणीने दिली पोस्ट शेअर करत माहिती
प्रसिद्ध अभिनेत्री अरुंधतीचा गंभीर अपघात झाला आहे. तिच्या अपघाताच्या वृत्तानंतर कलाविश्वात खळबळ माजली आहे.
मुंबई : प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री अरुंधती नायरचा गंभीर अपघात झाला आहे. अरुंधतीने विजय एंटनीसोबत शैतान सिनेमातून प्रसिद्धी मिळवली. अरुंधती 14 मार्चला एका मोठ्या बाईक दुर्घटनेची शिकार झाली. जेव्हा ती तिच्या भावासोबत बाईकवरुन चेन्नई कोवलम बाईपास रोड प्रवास करत होती. तेव्हा अभिनेत्रीच्या गाडीला एका गाडीने टक्कर दिली. त्यावेळी अभिनेत्री एका यूट्यूब चॅनलसोबत एका मुलाखत देवून परतत होती. रिपोर्ट्सनुसार, या अपघातानंतर अज्ञात वाहन बिलकूल थांबलं नाही. सध्या अभिनेत्रीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सध्या अभिनेत्री व्हेटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे.
अभिनेत्रीची बहिणी आरती नायरने सांगितलं की, सध्या अभिनेत्री व्हेंटिलेटरवर आहे आणि गंभीर स्थितीमध्ये आहे. अभिनेत्रीच्या बहिणीने पोस्ट शेअर करत लिहीलं की, ''तामिळनाडूच्या वृत्तपत्रं आणि टीव्ही वाहिन्यांवर आलेल्या बातम्यांचं स्पष्टीकरण देण्याची आम्हाला गरज वाटली. माझी बहीण अरुंधती नायर हिचा तीन दिवसांपूर्वी अपघात झाला होता. ती गंभीर जखमी झाली असून तिरुअनंतपुरममधील अनंतपुरी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर तिच्या आयुष्याशी लढत आहे.''
याचबरोबर अरुंधतीची मैत्रिण आणि अभिनेत्री गोपिका अनिलने तिच्या उपचारासाठी तिच्या चाहत्यांकडे आर्थिक मदत मागितली आहे. गोपिकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “माझी मैत्रिण अरुंधती नायरचा अपघात झाला आहे आणि तिची प्रकृती चिंताजनक आहे. व्हेंटिलेटरवर ती जीवाची परिक्षा देत आहे. त्यामुळे रुग्णालयाचा दैनंदिन खर्च भागवणं तिला कठीण जात आहे. आम्ही आमचे प्रयत्न करत आहोत पण रुग्णालयाच्या सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते पुरेसं नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की कृपया शक्य तितके योगदान द्या जेणेकरून तिच्या कुटुंबाला खूप मदत होईल. खूप खूप धन्यवाद."
2014 साली अभिनेत्री अरुंधती नायरने तिच्या करिअरची सुरुवात केली. पोंगे एझु मनोहरा या सिनेमातून तिने पदार्पण केलं. यानंतर सैथनसोबत ती एक लोकप्रिय अभिनेत्री झाली. यानंतर तिने ओट्टाकोरू कामुकन (2018) मध्ये शाऊन टॉम चाकोसोबत स्क्रिन शेअर केली. अभिनेत्री शेवटची आयिरम पोरकासुकल (2023) मध्ये झळकली होती.