Rani Chatterjee Casting Couch : अनेकवेळा बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउच झाल्याचा आरोप काही अभिनेत्रींकडून करण्यात आला आहे. आता कास्टिंग काउच हे फक्त बॉलिवूडच नाही तर टेलिव्हिजन, साऊथ फिल्म इंडस्ट्री आणि भोजपुरी सिनेमासृष्टीतही होताना दिसून येत आहे. भोजपुरी सिनेमांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने असा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.  साजिद खान (Sajid Khan) याने घरी बोलावून नको ते करायला सांगितले. साजिद खान याने घरी बोलावून म्हटले - 'अपनी स्कर्ट उठाओ, ब्रेस्ट साइज बताओ'. हा गंभीर आरोप कास्टिंग काउची शिकार झालेल्या अभिनेत्रीने केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोजपुरी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री राणी चॅटर्जी (Rani Chatterjee) देखील कास्टिंग काउचची (Casting Couch) शिकार झाली असली तरी तिला बॉलिवूडमध्ये हा अनुभव आला होता. वास्तविक, राणीने 2013 मध्ये फिल्ममेकर साजिद खान याची 'हिम्मतवाला' सिनेमाच्या संदर्भात भेट घेतली होती. जिथे तिला कास्टिंग काउचला सामोरे जावे लागले होते. जेव्हा साजिद बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून पोहोचला तेव्हा राणीने स्वतः ही घटना सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


राणी हिने केलेत हे आरोप  


राणीने सोशल मीडियावर एक मोठी पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने सांगितले की, तो बॉलिवूडचा खूप मोठा दिग्दर्शक असल्याने मी फोनवर त्याचे बोलणे ऐकले. त्याने मला घरी बोलावले आणि मी त्याच्या जुहूच्या घरी गेले जिथे तो एकटाच होता. सुरुवातीला त्याने मला 'धोखा धोखा' या गाण्यासाठी मला कास्ट करायचे आहे, ज्यामध्ये मला छोटा लेहेंगा घालावा लागेल, असे सांगितले. त्यामुळे त्याने मला माझे पाय दाखवायला सांगितले. मी त्यावेळी लांब स्कर्ट घातला होता, त्यामुळे त्याला मला गुडघ्यापर्यंत उचलाला लागला होता. 



बळजबरीने स्पर्श करण्याचाही केला प्रयत्न..


मी स्कर्ट गुडघ्यापर्यंत उलला त्यावेळी त्याने मला बळजबरीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर जेव्हा साजिदने मला माझ्या ब्रेस्ट साइजच्या आकाराबद्दल विचारले तेव्हा मी घाबरले. तो म्हणाला- लाजायची गरज नाही, तुझा बॉयफ्रेंड आहे की नाही? तुम्ही किती वेळा सेक्स करता? मी अस्वस्थ झाले आणि त्यांना विचारलं की हे सगळं का विचारताय? त्यांना वाटले की मी त्यांचे ऐकून घेऊन गप्प बसेन, पण मी लगेच तिथून निघून गेले. यादरम्यान त्याने मला बळजबरीने स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला. एवढ्या मोठ्या चित्रपट निर्मात्याच्या विरोधात बोलल्याबद्दल तिला चित्रपटसृष्टीतून बंदी घातली जाईल या भीतीने तेव्हापासून मी हे प्रकरण कोणाशीही शेअर केले नाही, असा खुलासाही राणीने केला आहे.