दीड वर्ष भाग्यश्री नवऱ्यापासून दूर, धक्कादायक खुलासा : VIDEO
लग्नाच्या 30 वर्षांनंतर भाग्यश्रीचा धक्कादायक खुलासा
मुंबई : सलमान खानसोबत 1989 मध्ये 'मैंने प्यार किया'मधून डेब्यू केलेली अभिनेत्री भाग्यश्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सिनेमांमुळे प्रकाशझोतात आलेली भाग्यश्री आपल्या खासगी जीवनामुळे चर्चेत आहेत. भाग्यश्रीने 1990 मध्ये मित्र हिमालय दासानीसोबत लग्न केलं. दोघांच नातं आजही कायम आहे मात्र अस असताना एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये भाग्यश्रीने आपल्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. विरल भयानीने हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये भाग्यश्री म्हणते की,'हा, हिमालय अगोदर माझ्या प्रेमात होते. मी त्यांच्याशी लग्न केलं. मात्र एक अशी वेळ होती जेव्हा आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो.'
एकावेळेला मला असं वाटलं की, जर माझ्या आयुष्यात ते मला भेटले नसते. आणि मी कुणा दुसऱ्याशी लग्न केलं असतं तर. ती अशी वेळ होती जेव्हा मी त्यांच्याशी तब्बल दीढ वर्ष वेगळी होती. त्या क्षणांची आताही आठवण झाली तरी भीती वाटते.'
भाग्यश्री आणि हिमालय यांची ओळख शाळेत झाली होती. दोघांच एकमेकांवर प्रेम होतं पण भाग्यश्रीच्या घरच्या या नात्याकरता तयार नव्हते. भाग्यश्री आणि हिमालयने लग्न करण्याचा निर्णय घेताल. सलमान खान, सूरज बडजात्या आणि काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत तिने मंदिरात लग्न केलं.
लग्नाचा करिअर असा परिणाम
लग्नानंतर भाग्यश्रीने काही सिनेमे केले पण ते देखील आपल्या नवऱ्यासोबत. ज्यामुळे तिच्या करिअरला खूप मोठा ब्रेक मिळाला. फक्त नवऱ्यासोबतच काम करण्याच्या तिच्या हट्टामुळे निर्माते तिला सिनेमांची ऑफर देणं टाळत असतं. भाग्यश्रीने हिंदीसोबतच भोजपुरी, मराठी, बंगाली, कन्नड आणि तेलुगू सिनेमांत काम केलं. भाग्यश्रीला 'मैंने प्यार किया' या सिनेमांत जो स्टारडम मिळाला होता. तो पुन्हा कधीच मिळाला नाही. 2010 मध्ये 'रेड अलर्ट' या सिनेमात भाग्यश्री शेवटची दिसली.