मुंबई : चाहत्यांनी दिशा पाटनीला पहिल्यांदा एम एस धोनी या सिनेमांत पाहिलं होतं. आणि प्रेक्षकांना तिच्या सुंदरतेची जाणीव झाली. या सिनेमांत दिशाने धोनीच्या पहिल्या गर्लफ्रेंड प्रियंका झा ची भूमिका साकारली होती. या सिनेमांत जरी तिचा सॉफ्ट रोल असला तरीही आता ती अॅक्शन सिनेमे करण्यास सज्ज झाली आहे. याला कारण देखील तसंच आहे. दिशाने इंस्टाग्रामवर शेअर केलेला व्हिडिओ. हा व्हिडिओ सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एक तर दिशाचा बिकीनी लूक आणि दुसरं कारण म्हणजे तिने केलेला स्टंट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना सामान्य स्टंट करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. पण इथे दिशाला पाण्यात स्टंट करताना आपण पाहू शकतो. या व्हिडिओत दिशा हँड स्टंट अगदी सहज करताना दिसत आहे. तसेच हा स्टंट करताना दिशा अगदी बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. व्हाइट बिकिनी घातलेली दिशा अगदी सेक्सी दिसत आहे. दिशाने हा स्टंट पोस्ट करताना चाहत्यांना या स्टंटचे चॅलेंज दिले आहे. तिने म्हटलं आहे की, हे कोण करू शकतं?




दिशाने आपल्या करिअरची सुरूवात तेलगु सिनेमांतून केली आहे. 2015 मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत दिशा एम एस धोनी या सिनेमांत दिसली. या सिनेमांत धोनीच्या पहिल्या प्रियसीची भूमिका साकारत तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केल आहे. दिशाचा आताच बागी 2 हा सिनेमा प्रदर्शित झाला.