मुंबई :  नुकताच जेलर या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  या ट्रेलरने जगभरातील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतल्यानंतर 'जेलर' फेम अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने खऱ्या अर्थाने दयाळूपणा दाखवला ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एका कार्यक्रमात बाऊन्सर्सने तमन्नाच्या चाहत्याला चुकून बाजूला ढकललं आणि याचं कारण म्हणजे तिच्या चाहत्याने  त्याच्या आवडत्या अभिनेत्रीच्या म्हणजे तमन्नाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. आणि तिच्यासोबत फोटो काढण्‍याचा प्रयत्‍न केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र गोंधळलेल्या गर्दीत अतिउत्साही चाहत्याला बाऊन्सरने बाजूला ढकलून दिलं. ही दुर्दैवी घटना लक्षात घेऊन तमन्नाने  त्वरीत यावंर हस्तक्षेप घेतला आणि निराश झालेल्या चाहत्याकडे ती गेली आणि हा खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तमन्नाच्या चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींकडून याचं खूप कौतुक होताना दिसतंय. 



तमन्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. 'जी करदा' आणि 'लस्ट स्टोरीज 2' हे दोन उत्तम प्रोजेक्ट्स यशस्वी झाल्यानंतर तिचं तामिळ चित्रपट 'जेलर'मधील 'काविलीया' हे गाणं खूप चर्चेत आहे.  एक दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाल्यानंतर आणि सोशल मीडियावर एक लाखाहून अधिक रील्स ट्रेंडिंगसह प्रचंड चार्टबस्टर बनले आहेत. 10 आणि 11 ऑगस्ट 2023 रोजी रिलीज होणार्‍या जेलर आणि भोला शंकर या तिच्या तमिळ आणि तेलुगु चित्रपटांसाठी ती खूप उत्सुक आहे. मल्याळममध्ये बांद्रा तमिळमध्ये अरनामाई 4 आणि हिंदीमध्ये "वेदा" यात ती झळकणार आहे.


रजनीकांत हे इंडस्ट्रीतील सर्वात लाडके अभिनेत्यांपैकी एक आहेत. सुपरस्टारची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे. आता त्यांच्या आगामी 'जेलर' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाची दक्षिणेत इतकी चर्चा आहे की चेन्नई आणि बंगळुरूमधील काही कार्यालयांनी रजनीकांतच्या 'जेलर'च्या रिलीजच्या दिवशी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.


चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर, रजनीकांतसोबत रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील आणि योगी बाबू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
या धमाकेदार चित्रपटात जॅकी श्रॉफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जेलर चित्रपटात रजनीकांत जेलर मुथुवेलच्या भूमिकेत दिसणार आहेत.