प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाशिवायच होणार आई, म्हणाली `मुलासाठी आता आणखी थांबू शकत नाही`
लग्न न करताच आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे आणि लोकांना हा प्रश्न पडला आहे की, या मुलाचे बाबा कोण असणार आहे?
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत येत असते. तिच्या वक्तव्यामुळे, तर कधी सिनेमामुळे, तर कधी तिच्या कामामुळे सोशल मीडियावरती लोकं तिच्याबद्दल बोलत असतात. काही लोकं तिची स्तुती करतात तर काही लोकं स्वराला ट्रोल देखील करतात. परंतु स्वरा कोणाचाही विचार न करता बिंधास्त आपल्याला जे वाटतं ते करते. हल्लीच स्वराने दिल्लीतील अनाथाश्रमातील मुलींसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली. ज्यामुळे ती चर्चेत आली होती. परंतु आता एका वेगळ्याच कारणामुळे अभिनेत्री चर्चेत आली आहे.
आता सोशल मीडियावर स्वरा भास्कर लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. परंतु लग्न न करताच स्वरा भास्कर आई होणार असल्यामुळे नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे आणि लोकांना हा प्रश्न पडला आहे की, या मुलाचे बाबा कोण असणार आहे? ज्यामुळे पुन्हा एकदा स्वरा चर्चेत आली आहे.
परंतु स्वरा भास्कर प्रेग्नेंटनसुन ती मूल दत्तक घेणार आहे. ज्याच्यासाठी तिने कार्यवाही सुरू केली आहे. अभिनेत्रीने संभाव्य दत्तक पालक म्हणून साइन इन केले. सध्या ती मूल दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत आहे.
स्वरा भास्करने एका मुलाखतीत कुटुंब आणि मुलाची इच्छा व्यक्त केली. यासोबत तिने सांगितले की, देशात किती लाख मुलं अनाथाश्रमात राहतात. स्वरा भास्करने केवळ दत्तक घेण्याची प्रक्रियाच सुरू केली नाही, तर मूल दत्तक घेतलेल्या अनेक जोडप्यांना भेटली देखील आहे.
'मिड डे'शी बोलताना स्वरा भास्कर म्हणाली, 'मला नेहमीच कुटुंब आणि मूल हवे होते. मला वाटते की, दत्तक घेणे हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे मी माझे हे स्वप्न पूर्ण करू शकतो. मी भाग्यवान आहे की, आपल्या देशात अविवाहित महिलांना मुले दत्तक घेण्याची परवानगी आहे. या काळात मला अनेक जोडपी भेटली ज्यांनी मूल दत्तक घेतले आहे. यासह, मला अनेक मुले भेटली आहेत ज्यांना दत्तक घेतले गेले होते आणि आता ती मोठी झाली आहेत. त्यांची प्रक्रिया आणि अनुभव मला समजले आहेत.
स्वरा भास्करने बऱ्याच संशोधनानंतर दत्तक घेण्याचा निर्णय पालकांना सांगितला आहे. त्याच्या या निर्णयाला त्याच्या पालकांनी पाठिंबा दिला आहे. स्वरा भास्कर म्हणाली, 'मी CARA च्या माध्यमातून दत्तक घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मला माहित आहे की, प्रतीक्षा थोडी लांब आहे, यास तीन वर्षे देखील लागू शकतात, परंतु मी दत्तक मुलाचे पालक होण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर स्वरा भास्कर आता 'शीर कोरमा' या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. या चित्रपटात स्वरा भास्कर एका लेस्बियनच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दिव्या दत्ता आणि शबाना आझमीही आहेत. 'शीर कोरमा' चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी यांनी केले आहे.