मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लग्नसराईची गडबड आहे. दीपिका पदुकोण - रणवीर सिंह पाठोपाठ आता चाहते त्यांच्या रिसेप्शनची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राचं देखील डिसेंबर महिन्यात लग्न आहे. चाहते या लग्नाची देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड ते अगदी हॉलिवूडपर्यंत प्रियंकाच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. जोधपुरमध्ये हा शाही सोहळा होणार आहे. तिच्या लग्नाची गडबड सुरू असताना आता एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला असून सोशल मीडियावर तिची खिल्ली उडवली जात आहे. 



या व्हिडिओत असं दिसतंय की, एक मुलगा आणि मुलगी एअरपोर्टवर प्रियंकाची ऑटोग्राफ घेतात. आणि नंतर हीच दोघंजण धावत जाऊन पुढे पुन्हा एकदा प्रियंकाची ऑटोग्राफ घेतात. यानंतर प्रियंका एअरपोर्टच्या बाहेर पडतात आणि तिथे पुन्हा ते दोघे येतात. त्यामुळे या व्हिडिओतील हे दोघे जण संशयास्पद आहेत.


प्रियंका आपले Fake Fans तर तयार करत नाही ना? असा प्रश्न या व्हिडिओमुळे निर्माण झाला आहे. एका ठिकाणी लग्नाची गडबड असताना प्रियंकाचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना नाराज करू शकतो