इरफान आणि सोनाली पाठोपाठ शाहीदही कॅन्सरच्या विळख्यात?
चाहत्यांना मोठा धक्का
मुंबई : गेल्या कित्येक महिन्यांपासून बॉलिवूडमधील कलाकारांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सर्वात अगोदर इरफान खान त्यानंतर सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचं उघड झालं. आता बी टाऊनमधील चॉकलेट बॉयला कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे.
शाहिद कपूरला कॅन्सर झाल्याची माहिती समोर आली आहे. अद्याप शाहिदच्या कुटुंबियांनी याबाबत कोणतीच अधिकृत माहिती दिली नाही. त्यांच असं म्हणणं आहे की, लोकं काहीही बोलतात. याबातमीला काय आधार आहे.
याबाबत शाहिद कपूरची मॅनेजर आकांक्षाने सांगितलं की, ही गोष्ट अतिशय धक्कादायक आहे. आम्हाला हे ऐकूनच धक्का बसला आहे. ही गोष्ट खोटं असल्याच तिने सांगितलं आहे. शाहिद कपूर सध्या आपल्या खाजगी कामामुळे दिल्लीत आहे दोन दिवसांत मुंबईत परतणार आहे.
शाहिद कपूरला स्टमक कॅन्सर झाल्याची बातमी समोर आली आहे. शाहिदचा कॅन्सर पहिल्या स्टेजवर असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शाहिद कपूरच्या चाहत्यांना सर्वात मोठा धक्का बसला आहे.