मुंबई : अदनान सामीने 'तेरा चेहरा', 'सुन जरा' आणि 'दिल क्या करे' यांसारख्या गाण्यांनी लोकांच्या हृदयावर अशी छाप सोडली आहे की, आजही लोकं ही गाणी गुणगुणताना दिसतात. ही गाणी गायलेला प्रसिद्ध गायक अदनान सामी गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या गाण्यांसोबतच त्याच्या लूकमुळेही चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदनानी सामी आधी खूपच जाड होता. पण गेल्या काही वर्षात त्याचं वजन इतकं कमी झालं की, लोक त्याला पाहून आश्चर्यचकित झाले. पण आता मालदीवमधून या प्रसिद्ध गायिकेची असे फोटो  समोर आले आहेत ज्यात त्याचं इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे की, त्याला पाहून तुम्हीही फसून जाल. पहा अदनान सामीच्या फॅमिलीसोबत मालदीवच्या व्हेकेशनचे फोटो.


सध्या अदनान सामी आपल्या कुटुंबासोबत मालदीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. या व्हेकेशनमधील सिंगरने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यात त्याचा लूक पाहून तुम्ही थक्क व्हाल.


अदनानने सोशल मीडियावर एक क्लोज-अप सेल्फीही शेअर केला आहे. या फोटोत अभिनेत्रीने निळ्या टी-शर्टसह गॉगल घातलेला दिसत आहे. फोटोमागील पार्श्वभूमी केवळ नेत्रदीपकच नाही तर अभिनेत्याचं अप्रतिम परिवर्तन पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत.


50 वर्षीय अदनान सामीच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून चाहते सतत कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिलं की, 'मला माझ्या डोळ्यांवर अजिबात विश्वास बसत नाही. बरेच बदल. तर दुसर्‍या एका यूजरने कमेंट करत लिहीलं की, 'लोकं दिवसेंदिवस जाड होत आहेत. पण अदनान सामी दिवसेंदिवस तरुण होत चालला आहे.



तर अजून एका युजर्सने कमेंट करत म्हटलं की,  'परफेक्ट जॉ लाईन आणि उत्तम वजन कमी. प्रेरणा.' अशा अनेक कमेंटचा वर्षाव गायकावर होतोय. अदनान सामीच्या या अद्भुत ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अदनानच्या या ट्रान्सफॉर्मेशनचं सर्वजण कौतुक करत आहेत.