Sholay Movie : 'कितने आदमी थे?....' किंवा 'अब तेरा क्या होगा कालिया....?' हे असे डायलॉग तुम्ही थट्टा मस्करीमध्ये कोणालातरी एकदारही म्हटले असतील. अगदीच नाही, तर यावरून तुम्ही खिल्लीही उडवली असेल. प्रत्येकाच्याच तोंडी असणारे हे डायलॉग आहेत रमेश सिप्पी दिग्दर्शित 'शोले' या चित्रपटातील. भारतीय चित्रपटसृष्टीत 15 ऑगस्ट 1975 ला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर या चित्रपटाची लोकप्रियता बेताची ठरली. पण, त्यानंतर मात्र पाहता पाहता या चित्रपटानं सर्व बॉक्स ऑफिस विक्रम मोडले. रमेश सिप्पी यांच्यासह चित्रपटातील प्रत्येक कलाकारासाठी 'शोले' मैलाचा दगड ठरला. जय, विरू, ठाकूर, बसंती, कालिया इतकंच काय तर जेलरही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेला. असा हा 'शोले' तुम्ही पाहिलाय का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाहिला असेलच. किंवा नसेलही पाहिला तरीही त्यातील काही दृश्य या न त्या माध्यमातून तुमच्यासमोर आली असतीलच. असा हा विक्रमी चित्रपट, त्यातील काही दृश्य म्हणे एका हॉलिवूडपटावरून कॉपी करण्यात आली आहेत. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहा. 



आता 'शोले' चित्रपटातील ते दृश्य आठवा, जिथं गब्बर त्याच्या साथीदारांसह ठाकूर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपवतो. आठवला तो सीन? आता हा व्हिडीओ आणि ते दृश्य यांच्यामध्ये किती साधर्म्य आढळतंय ते पाहा. जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण हा सीन सर्जिओ लिओनीच्या Once Upon A Time in the West या चित्रपटातून जसाच्या तसा उचलण्यात अर्थाच Copy करण्यात आला आहे. 


हेसुद्धा पाहा : राधिका आपटेचा 'बौद्ध विवाह' चर्चेचा विषय; Video पाहून नेटकरी भारावले, कौतुकाचा वर्षाव


एखाद्या चित्रपटापासून किंवा एखाद्या कथेपासून प्रेरणा घेत चित्रपच साकारला जाणं ही काही नवी बाब नाही. किंबहुना मागील काही वर्षांमध्ये विविध भाषांधील चित्रपटांचे रिमेकही नवे राहिलेले नाहीत. पण, हे रिमेक प्रकरण हल्लीचंच नाही, तर बऱ्यापैकी जुनं आहे असंच म्हणावं लागेल. 'शोले'चं ते दृश्य आणि हॉलिवूड चित्रपटातील दृश्यांमध्ये असणारं साधर्म्य हा योगायोग तर नाहीच हे इथं पुन्हापुन्हा लक्ष येतंय. असो, भारतीय कलाजगतासाठी 'शोले' कायमच मैलाचा दगड राहिलाय आणि यापुढेही राहील हे मात्र नाकारता येणार नाही. काय मग, आज पाहणार ना हा चित्रपट?