Shraddha Kapoor: सेलिब्रेटी कुठेही स्पॉट झाले की लगेचच पापाराझी त्यांच्या मागे मागे करायला लागतात. सध्या श्रद्धा कपूरचा एक व्हिडीओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे श्रद्धा कपूरची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. यावेळी श्रद्धा कपूरचा फोटो काढण्यासाठी पापाराझी फारच जोरात धावायला गेला तेवढ्यात त्याच्या कॅमेऱ्याची लेन्स तूटते. तेवढ्यात हे श्रद्धा कपूर पाहते आणि त्याची जमिनीवर पडलेल्या कॅमेऱ्याची लेन्स ही उचलून त्याला परत देते. तेव्हा त्याला हे आश्वासनही देते की ती त्याला नवीन लेन्स आणून देईल आणि त्याला त्याचे पैसे विचारते. त्यावेळी तो फोटोग्राफर तिला नको नको म्हणत असतो. परंतु यावेळी तिनं जो मोठेपणा दाखवला हे पाहून सगळेच तिचे कौतुक करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर ती परत आपल्या गाडीत बसते आणि तिथून निघून जाते. यावर्षी शद्धा कपूरचा तू झूठी मैं मक्कार हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेव्हा तिची जोरात चर्चा आहे. यावेळी तिचा रणबीर कपूरसोबतचा हा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्या दोघांची कमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडली होती. सोशल मीडियावरही तिचे असंख्य फॉलोवर्स आहेत. त्यामुळे तिची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळते आहे. अशातच आता तिच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा आहे. शद्धा कपूर ही शक्ती कपूरची मुलगी आहे. त्यामुळे त्यांचीही जोरात चर्चा आहे. शक्ती कपूरही आपल्या आगळ्यावेगळ्या आणि हटके चित्रपटांसाठी ओळखले जातात. 


यावेळी श्रद्धा कपूर ही मुंबईतील एका नामांकित कार्यक्रमात सहभागी झाली होती. कार्यक्रम संपल्यानंतर तिनं पापाराझींशी मराठीतही संवाद साधला. अनेकदा ती पापाराझींशी मराठीतूनही बोलताना दिसते. त्यानंतर चालता तिच्या पुढ्यात फोटोग्राफर्सची लेन्स येऊन पडली आणि मग त्यानं सोशल मीडियावर वेगळीच चर्चा सुरू झाली होती. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिच्या पुढ्यात त्या पापाराझीची महागडी लेन्स तुटल्यानं तिला फार वाईट वाटले. आता ती लवकरच स्त्रीच्या सिक्वेलमध्ये दिसणार आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, क्रिती सेनॉन, विजय राझ, नोरा फतेही, अभिषेक बॅनर्जी अशी कास्टही यात आहे.