भावाचं गाणं ऐकताच श्रद्धाच्या डोळ्यात पाणी
सिद्धांत कपूर लवकरच गायन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूर लवकरच गायन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. डिसेंबरमध्ये त्यांचा 'यारम' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच श्रद्धा भावुक झाली आहे. तिने आपल्या भावाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. भावाचा हा व्हिडिओ पाहून तिच्या डोळ्यात पाणी आलं आहे.
व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने 'जेव्हा मी माझ्या भावाचं हे गाणं ऐकलं तेव्हा मला आश्रु अनावर झाले.' त्याचप्रमाणे तिने आपल्या मोठ्या भावाला जगातील उत्तम व्यक्ती म्हणूण संबोधले आहे.
'यारम' चित्रपटात सिद्धांत कपूर सोबतच प्रतीक बब्बर देखील झळकणार आहे. हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय मूलचंदानी चित्रपटाचे निर्माते आहेत.