मुंबई : सोशल मीडियावर सध्या श्रद्धा कपूरच्या एका फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे. श्रद्धा कपूरने स्वतः हा फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसोबत तिने कॅप्शन देखील लिहिली आहे. या कॅप्शनमुळेच सध्या श्रद्धा टॉप ट्रेंडमध्ये आहे. आणि त्याला कारण देखील तसंच काहीस आहे. श्रद्धा कपूरने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि गुलाबी रंगाचा दुपट्टा दाखवत आहे. 



गेल्या काही दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. सोनम कपूर आपला बॉयफ्रेंड आणि बिझनेसमन आनंद अहुजासोबत लग्न करत आहे. हे लग्न मुंबईत होणार असून यासाठी श्रद्धा कपूर तयार होत असल्याची चर्चा रंगली आहे.