मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर बऱ्याचदा तिच्या चित्रपटांमुळे आणि तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. पण अलीकडे ही अभिनेत्री तिच्या लग्नामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. खरं तर, श्रद्धा कपूरबद्दल अशी बातमी आली होती की अभिनेत्री तिचा बॉयफ्रेंड रोहन श्रेष्ठसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी हे स्पष्टपणे नाकारले होते. त्याचबरोबर अलीकडेच श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांनीही तिच्या आणि रोहन श्रेष्ठच्या लग्नावरील मौन तोडले आहे. शक्ती कपूरने सांगितले की रोहनने त्याला अद्याप आपल्या मुलीचा हात मागितलेला नाही.


श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठ यांच्या लग्नाविषयी बोलताना शक्ती कपूर म्हणाले, “रोहन एक कौटुंबिक मित्र आहे. मी त्याच्या वडिलांना अनेक वर्षांपासून ओळखतो. रोहन बऱ्याचदा आमच्या घरी सुद्धा येतो, पण आजपर्यंत त्याने माझ्याकडे श्रद्धाचा हात मागितला नाही. याशिवाय आजकाल मुलं त्यांच्या स्वतःच्या गोष्टी स्वतःच ठरवतात.



श्रद्धा कपूरबद्दल बोलताना शक्ती कपूर पुढे म्हणाले, "जर श्रद्धा स्वतः माझ्याकडे आली आणि म्हणाली की तिने तिचा जीवनसाथी निवडला आहे किंवा जर सिद्धांतने ही मला या गोष्टी सांगितल्या, तर मी लगेच सहमत होईन. 


मी नकार का देईन? पण या दिवसात ते आपापल्या करिअरवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. लग्न हा एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे आणि आज लोक ज्या प्रकारे तो मोडत आहेत, ते मला खूप त्रास देते.