श्रद्धा लवकरच अडकणार विवाह बंधनात
अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न बंधनात अडकणार असण्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत.
मुंबई : 'आशिकी २' चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण केलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर लवकरच लग्न बंधनात अडकणार असण्याच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. २०२० मध्ये श्रद्धा लग्न करणार आहे. याआधी श्रद्धाचे अभिनेता फरहान अख्तर, आदित्य कपूर यांच्यासह नाव जोडण्यात आले होते. श्रद्धा नेहमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल बोलण्याचे टाळते.
डीएनएने दिलेल्या गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा चांगल्या रंगत आहेत. मागील दोन वर्षांपासून रोहन-श्रद्धा एकमेकांना डेट करत आहेत. श्रद्धा २०२०मध्ये विवाह बंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
परंतू, अभिनेते शक्ती कपूर यांनी या सर्व अफवा असल्याचे सांगत सर्व चर्चांना पूर्ण विराम दिला आहे. ते म्हणाले 'श्रद्धा किमान दोन ते तीन वर्ष तरी लग्न करणार नाही. कारण तिच्याकडे सध्या खूप प्रोजेक्ट्स आहेत' रोहन श्रेष्ठा हा एक बॉलिवूड फोटोग्राफर आहे.