कोरोनामुळे प्रसिद्ध गायकाचा मृत्यू; कलाविश्वाला मोठा धक्का
कोरोना व्हायरसने आता कलाविशावात देखील शिरकाव केला आहे.
मुंबई : कोरोना व्हायरसने आता कलाविश्वात देखील शिरकाव केला आहे. अनेक कलाकार कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर कोरोना व्हायरसने अनेकांचा जीव घेतला आहे. आता देखील संगीतविश्वातील एक जोडी तुटली ती म्हणजे, नदीम-श्रवण यांची. 'आशिकी' फेम संगीतकार श्रवण राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ते उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाल होते.
मुंबईच्या रहेजा रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. 66 वर्षीय श्रवण व्हेंटिलेटरवर होते. श्रवण यांच्या मृत्यूची बातमी दिग्दर्शक अनिल शर्मायांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. 'अत्यंत दुःख होत आहे. कोरोना व्हायरसमुळे प्रसिद्ध संगीतकार श्रवण आपल्याला सोडून गेले. ' असं अनिल यांनी ट्विट करत लिहिलं आहे.
श्रवण यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, 1990 साली नदीम-श्रवण (Nadeem-Shravan) या जोडीने चाहत्यांना वेड लावलं होतं. नदीम-श्रवण एकत्र गाण्याची चाल तयार करायचे. 'आशिकी' चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना नवी दिशा मिळाली. पण जेव्हा गुलशन कुमार यांच्या हत्येमागे नदीम यांचा हात असल्याचं सांगण्यात आलं तेव्हापासून नदीम-श्रवण यांच्या जोडीला नजर लगाली.
नदीम-श्रवण या प्रसिद्ध जोडीने 'आशिकी', 'साजन', 'सडक', 'दिल है की मानता नहीं', 'साथी', 'दीवाना', 'फूल और कांटे', 'राजा हिंदुस्तानी', 'जान तेरे नाम' 'रंग', 'राजा', 'धडकन', 'परदेस', 'दिलवाले', 'राज' अशा अनेक चित्रपटांना संगीत दिलं.