मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे आणि मनोरंजनाची एक वेगळी सीमा उंचवणारा शो म्हणजे झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या' हा शो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोमधील सर्वच मंडळी प्रत्येकाला हवीहवीशी वाटली.  डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे या विनोदवीरांनी भरभरून मनोरंजन केलं. मात्र काही दिवसांपूर्वी रसिकांना हसवणारा हा लाडका शो काही काळासाठी बंद झाला आहे.


अल्पविराम घेऊन चला हवा येऊ द्या या शोची टीम परदेशवारीवर गेली आहे. लंडन, पॅरिसमध्ये चला हवा येऊ द्या शोच्या टीमनं धम्माल मस्ती केली. या ठिकाणी विविध स्टेज शो या टीमनं केले आहेत. परदेश दौरा असल्यावर धम्माल म-स्ती तर होणारच. 











या विनोदवीरांमध्ये श्रेया बुगडेही काही मागे नाही. तीसुद्धा शोमध्ये कधी श्रीदेवीची मिमिक्री करते तर कधी हटके भूमिका साकारुन रसिकांचं मनोरंजन करते.अशीच धम्माल श्रेयानं परदेश दौ-यातही केली.छोट्या पडद्यावर रसिकांना हसवणा-या श्रेयानं ही परदेशवारी बरीच एन्जॉय केली. यावेळी विविध कलाकारांची मिमिक्री करत परदेशातील आपल्या फॅन्सचं मनोरंजन केलं.


श्रेया कायमच आपल्या अभिनयाने सर्वांना अचंबित करते. तिचा आतापर्यंतचा थुकरटवाडीतील प्रवास हा थक्क करणारा आहे. तिच्या या प्रवासातील आणि परदेश दौऱ्यातील काही खास फोटो