मुंबई : 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्रेया बुगडे सध्या यशाच्या शिखरावर आहे. भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे या विनोदी कलाकारांसोबत श्रेया बुगडेने आपलं स्थान भक्कम केलं आहे. श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव आहे. सध्या तिच्या नव्या टॅटूची जोरदार चर्चा रंगली आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

#newink म्हणतं तिने हा फोटो शेअर केला आहे. यासोबत श्रेयाने 'मैं......... खुद को महसूस कर लिया करो,
कुछ रौनकें; खुद से भी हुआ करती है' अशी शायरी शेअर केली आहे. श्रेया बुगडेचा हा पहिला टॅटू नाही. 


श्रेयाने या अगोदर आपल्या मानेवर 'दुर्गा माँ' चा टॅटू काढला आहे.




तसेच तिच्या हातावार बहिणीचा मुलगा 'आराध्य' च्या नावाचा टॅटू काढून घेतला आहेत.



श्रेयाच्या हातावर तिसऱ्या टॅटू म्हणजे 'इक्विलिबीरियम' काढला आहे. आणि आता श्रेयाने चौथा टॅटू काढला आहे. तो टॅटू म्हणजे 'मैं' हा हिंदीतील अक्षर आहे.