Shreyas Talpade : झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हिज निर्मित, महेश मांजरेकर दिग्दर्शित 'ही अनोखी गाठ' या चित्रपटातील पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. 'मी रानभर' असे बोल असणारे हे गाणे श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्यावर चित्रित झाले असून बेला शेंडेचा या प्रेमगीताला सुमधूर आवाज लाभला आहे. तर हितेश मोडक यांचीही या गाण्यासाठी साथ लाभली आहे. हितेश मोडक यांचेच संगीत लाभलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांचे बोल लाभले आहेत. मुळात गौरी एक उत्कृष्ट नर्तिका असल्याने तिचे बहारदार नृत्य पाहाण्याची संधी प्रेक्षकांना या गाण्यातून मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गाण्याबद्दल महेश मांजरेकर म्हणतात, " प्रेमदिनाच्या निमित्ताने हे प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. खूप सुंदर, भावपूर्ण बोल आणि संगीत लाभलेल्या या गाण्याला गायकही तितकेच दर्जेदार लाभले आहेत. त्यामुळे या गाण्यात अधिक रंगत येत आहे. नवीन नात्याची सुरूवात या गाण्यातून दिसत आहे. हे नाते कसे बहरतेय, याचे सुंदर चित्रण यातून सादर होत आहे.’’


हेही वाचा : Valentine's Day ला साई पल्लवीच्या पोस्टन चुकवला काळजाचा ठोका; नागा चैतन्यसोबत…


झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, " अनोखी प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटात हे गाणे अतिशय चपखल बसत आहे. प्रेमाच्या तरल, हळुवार भावना यातून व्यक्त होत आहेत. श्रवणीय असे हे गाणे प्रेमीयुगुलांना नक्कीच आवडेल.’’ 



या चित्रपटाविषयी बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, "नात्याची एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयससोबत प्रथमच काम करतोय. त्याचा अभिनय मी पाहिला आहे. तो अतिशय हुशार अभिनेता आहे. एक कलाकार म्हणून स्वतःला नेहमीच समृद्ध करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक व्यक्तिरेखेला तो शंभर टक्के न्याय देतो. त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव कमाल होता. या चित्रपटात ऋषीचीही भूमिका आहे. 'ही अनोखी गाठ'च्या निमित्ताने गौरीला पुन्हा एकदा तिचे नृत्यकौशल्य सादर करण्याची संधी मिळाली आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनेक नावाजलेले कलाकार आहेत. खूप साधी, सरळ तरीही अनोखी अशी ही प्रेमकहाणी आहे. झी स्टुडिओजसोबत याआधी बरेच चित्रपट केले आहेत, त्यामुळे त्य्नाच्यासोबतचा अनुभव हा नेहमीच कमाल असतो. एक सुंदर कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करत आहोत, खात्री आहे प्रेक्षक त्याला इतर चित्रपटांप्रमाणेच आपलेसे करतील.''