श्रीदेवीला करायच होतं मराठी सिनेमात काम
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. मराठी सिनेमा, रियॅलिटी शोच्या कार्यक्रमात ती दिसत असे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुबईत कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. आज रात्री ८ वाजेपर्यंत पार्थिव मुंबईत आणले जाणार आहे. तिच्या अनेक आठवणी उजागर केल्या जात आहेत. तिचे किस्से, सिनेमा, हिट गाणी या सर्वांतून श्रीदेवी पुन्हा पुन्हा आठवतेय. मराठी सिनेमा, रियॅलिटी शोच्या कार्यक्रमात ती दिसत असे.
'चला हवा येऊ द्या' मध्ये श्रीदेवी यांनी खूप एन्जोय केला. खूप वर्षांपूर्वी त्यांनी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
दुबईत मृत्यू
सूत्रांच्या माहितीनुसार, शनिवार रात्री 11 वाजता श्रीदेवी हॉटेलच्या बाथरूममध्ये पडल्या.
त्यानंतर त्यांना तात्काळ राशिद रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दुबईतील प्रसिद्ध जुमेराह इमीरात हॉटेलमध्ये त्या थांबल्या होत्या.
अचानक एक्झिट
श्रीदेवी या आपल्या कुटुंबियांसोबत एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेल्या होत्या. श्रीदेवींच्या निधनाने संपूर्ण बॉलिवूडवर विश्वावर शोककळा पसरली आहे. अनेकांना या बातमीने धक्का बसला आहे.
'मराठी सिनेमात काम करायचय'
२०१५ मध्ये केदार शिंदेचा 'अगं बाई अरेच्चा' सिनेमा येत होता. याला निशादने संगीतबद्ध केले होते. या सिनेमाच्या म्युझिक लॉंचला श्रीदेवी उपस्थित होत्या.
त्यावेळी त्यांनी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांचे हे स्वप्न आता पूर्ण होणार नसल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.