अखेर Shruti Haasan कडून प्रेमाची कबुली, जाणून घ्या कोण आहे `तो`
सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसन देखील बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे.
मुंबई : सुपरस्टार कमल हसनची मुलगी श्रुती हसन देखील बॉलिवूडमध्ये खूप लोकप्रिय आहे. अशा परिस्थितीत चाहते तिच्या प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत असतात. अभिनेत्रीने बरेच दिवस आपलं नातं चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र आता तिने जाहिरपणे आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि संतनू हजारिका एकत्र दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये हे कपल त्यांच्या नात्याशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. या व्हि़डिओमध्ये श्रूती कपल चॅलेंज करताना दिसत आहे. गेल्या महिन्यात एका टॉक शोमध्ये बोलताना अभिनेत्रीने तिच्या लव्ह लाईफबद्दल अनेक खुलासे केले होते. त्याचबरोबर या व्हिडिओमध्येही श्रुती अनेक खुलासे करताना दिसत आहे.
इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये श्रुती संतनु हजारिकासोबत कपल चॅलेंजमध्ये सहभागी होताना दिसत आहे. क्लिपची सुरुवात "प्रथम कोण इंट्रेस्टेड होतं?" या प्रश्नाने होते, ज्याकडे अभिनेत्री पटकन संतनुकडे बोट दाखवते, त्यानंतर पुढचा प्रश्न येतो, "कोण पहिलं आय लव्ह यू म्हणालं?".याला उत्तर देताना दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवलं, मात्रनंतर श्रुतीने पहिल्यांदा 'आय लव्ह यू' म्हटल्याचे तिनेच कबूल केलं. श्रुतीने व्हिडीओला कॅप्शन देत लिहिलं आहे की, "स्लिपी फेस".
या व्हिडिओवर बहीण अक्षरा हसनने कमेंन्ट केली आहे आणि लिहिलं की, "खरंच एक गुड मॉर्निंग". हसन बहिणी अनेकदा एकत्र दिसतात, कधी वर्कआउट सेशनसाठी, तर कधी आउटिंगसाठी. अलीकडेच श्रुतीने दोघांचा स्वयंपाक करतानाचा एक मजेदार व्हिडिओही शेअर केला होता. ज्यामध्ये दोन्ही बहिणी एकत्र 'पावलोवा' बनवताना दिसत आहेत.