मुंबई : अभिनेत्री श्रृती हसनने तिच्या रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. सध्या ती जीवनसाथीच्या शोधात आहे. नुकताच 'फिट अप विथ द स्टार तेलगू'च्या सेटवर तिने तिच्या नात्यांबद्दल आणि खासगी आयुष्याबद्दल संवाद साधला. तुझे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले होते? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रश्नाचे उत्तर देताना ती म्हणाली, 'नाही माझ्या आयुष्यात फक्त एकच व्यक्ती होती.' त्यानंतर तिला 'आपण सर्वच रिलेशनशिपमध्ये असतो आणि अनेक वेळा प्रेम विरहाचा देखील सामना करावा लागतो, या बद्दल तुझं काय मत आहे?'


प्रेमाबद्दल भाष्य करताना ती म्हणाली, 'आपल्या जीवनात आपल्याला अनेक लोक भेटतात. आपल्या चांगल्या काळात सगळेच आपल्या सोबत असतात. पण तेच आपल्यावर वाईट वेळ आली तर हिच चांगली माणसं आपल्यापासून दूर आहे. मला याबद्दल काही खंत वाटत नाही.'


ती पुढे म्हणाली माझ्यासाठी हा एक उत्तम अनुभव आहे. पण अद्यापही मी खऱ्या प्रेमाच्या शोधात असल्याचे श्रृती म्हणणे आहे. श्रृती एका प्रामाणिक आणि खऱ्या जीवनसाथीच्या शोधात आहे.