मुंबई : अभिनेता आयुषमान खुराना सध्या वेगळ्या थाटणीचे चित्रपट साकारताना दिसत आहे. 'ड्रीम गर्ल' चित्रपटाच्या माध्यमातून त्याने काढलेल्या पूजाच्या आवाजाने सर्वांनाच घायाळ केले. 'ड्रीम गर्ल'नंतर तो 'शुभ मंगल जादा सावधान' या समलैंगिकतेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटामध्ये एका 'गे'ची भूमिका साकारताना दिसणार आहे. विनोदी कथे भोवती फिरणाऱ्या या चित्रपटाला समलैंगिकतेची जोड देण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आयुषमानने त्याच्या सोशल मीडिया आकाउंटच्या माध्यमातून चित्रपटाचा टीझर पोस्ट केला आहे. टीझर पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये '''शुभ मंगल सावधान' चित्रपटाच्या यशानंतर आम्ही घेवून आलो आहोत 'शुभ मंगल जादा सावधान', आम्ही खुप मेहनत करत आहोत. तुम्ही देखील थोडं प्रेम जास्त द्या.' असे त्याने लिहिले आहे.' 


'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात तो जितेंद्र कुमार सोबत रोमांन्स करताना दिसणार आहे. चित्रपटात या दोघांव्यतिरिक्त नीना गुप्ता, गजराज राव, मनु ऋषी चड्ढा, सुनीता राजवार, मानवी गगरू, तृप्ती पंखुड़ी अवस्थी आणि नीरज सिंह झळकणार आहेत. १३ मार्च २०२० रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.