मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. तिच्या प्रत्येक फोटोची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगलेली असते. आता देखील मलायकाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये तिने बॅकलेस ड्रेस घातला आहे. पण तिच्या बॅकलेस ड्रेसची दोरी कोणीतरी खेचताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही, जेव्हा मलायकाने तिच्या बॅकलेस लूकने चाहत्यांना घायाळ केलं आहे. पण मलायकाचा आता जो फोटो व्हायरल होत आहे, तो एका जुन्या पार्टीतील आहे. 



फोटोमध्ये मलायकाच्या बॅकलेस ड्रेसची दोरी खेचताना एक व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून श्वेता बच्चन (Shweta Bachchan) आहे.  अनेक दिवसांनी मलायका आणि श्वेताचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. 



दरम्यान, काही दिवसांपूर्वी मलायकाच्या गाडीला अपघात झाला होता. तेव्हा ती जखमी देखील झाली होती. पण आता तिची प्रकृती स्थिर आहे. अपघातानंतर मलायकाला पहिल्यांदा अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये स्पॉट करण्यात आलं.