सैफचा लेक नाही, तर पलक तिवारी `या` अभिनेत्याला करतेय डेट
लेकीच्या अफेअरबद्दल श्वेता तिवारीला कल्पना? इब्राहीम खान नाही, तर `या` अभिनेत्याला करते डेट
मुंबई : अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी ही अशा स्टार किड्सपैकी एक आहे, ज्यांची बॉलिवूडमध्ये एंट्री होण्यापूर्वीच चर्चा सुरु असते. पलक तिवारी गायक हार्डी संधूसोबत 'बिजली-बिजली' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसल्यापासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर दुसरीकडे पलक अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम अली खानसोबत असलेल्या नात्यामुळे देखील चर्चत होती. इब्राहीम आणि पलक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगत असताना, पलकचं नाव अन्य अभिनेत्यासोबत जोडल जात आहे.
इब्राहीमसोबत नाव जोडल्यानंतर पलकने आम्ही फक्त चांगले मित्र असल्याचं सांगितलं आहे. पण आता पलक अभिनेता वेदांग रैनाला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, वेदांग आणि पलक गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. वेदांग रैना फिल्ममेकर झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चीज' सिनेमात सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूरसोबत दिसणार आहे.
रिपोर्टनुसार, पलत तिवारी आणि वेदांग रैना दोघांची टॅलेंट एजन्सी एकच आहे. दोघेही एजन्सीने आयोजित केलेल्या पार्टीत भेटले होते. दोघे दोन वर्षांपासून डेट करत आहेत. श्वेता तिवारीलाही लेकीच्या अफेअरबद्दल माहिती आहे.
पलक आणि वेदांग एकमेकांसोबत आनंदी असल्यामुळे श्वेता देखील आनंदी आहे. दोघांनाही सध्या त्यांच्या करिअरवर लक्ष केंद्रित कराण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोघांनी सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केलेला नाही.