मुंबई : श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आजकाल ती तिच्या लूक आणि फिटनेसबद्दल किंवा तिच्या आश्चर्यकारक परिवर्तनाबद्दल चर्चेत आहे. श्वेता तिवारीचं परिवर्तन खूपच कमालीचं आहे. कदाचित यामुळेच प्रत्येकाला तिच्या फिटनेसचं रहस्य जाणून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचं असेल की, श्वेता तिवारीने इतकं वजन कसं कमी केलं? तरमग आज आम्ही तुम्हाला या बद्दल सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसं, श्वेता तिवारीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुम्हाला तिच्या फिटनेसशी संबंधित अनेक व्हिडिओ आणि फोटो सापडतील. श्वेताचा असा विश्वास आहे की, वजन कमी करण्यासाठी इच्छाशक्ती, समर्पण आणि स्वतःवर नियंत्रण आवश्यक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, श्वेताने तिच्या शरीराला परिपूर्ण आकारात आणण्यासाठी तिच्या डाईटवर काम केलं आहे.


त्याचवेळी, श्वेता तिवारीने तिच्या मुलाच्या जन्मानंतर तिच्या वजन कमी करण्याचा प्रवास चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केला आणि सांगितलं की, दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर तिने 10 किलो वजन कमी केलं आहे, तेही केवळ डाईटवर नियंत्रण ठेवून. डाएटनंतर श्वेता हळूहळू वर्कआऊट करू लागली.



मीडिया रिपोर्टनुसार, फिट शरीर मिळवण्यासाठी श्वेता आठवड्यातून किमान 3 दिवस नक्कीच जिम करते. पण ज्या दिवशी अभिनेत्री जिमला जाऊ शकत नाही, त्या दिवशी ती घरी 1 तास ट्रेडमिलवर धावते. याशिवाय, श्वेता तिवारीने पोटाची चरबी कमी करण्यासाठी तिच्या वर्कआउटमध्ये कार्डिओ आणि वेट लिफ्टिंग एक्सरसाइजचा समावेश केला आहे. याशिवाय श्वेता निश्चितपणे योगा करते.