मुंबई : दिवाळी जवळ आली आहे आणि बॉलिवूडमध्ये दिवाळी जोरात साजरी करण्यात येत आहे. सगळेच लोक आता सणाच्या मूडमध्ये आहेत. प्रत्येक दिवशी एकतरी सेलिब्रिटी हे दिवाळी पार्टीचे आयोजन करताना दिसतात. काल म्हणजेच 20 ऑक्टोबरच्या रात्री प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं ग्रँड दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, पार्टीतला  सिद्धांत चतुर्वेदीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पापाराझींनी त्याला चिडवल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, सिद्धांत चतुर्वेदी पार्टीमध्ये क्रीम रंगाचा कुर्ता घालून आला होता. येताच त्यानं पापाराझीला फ्लाइंग किस दिली आणि आत पळून गेला. पण, पापाराझी म्हणाले, 'सर नव्याजी येत आहेत, थांबू नका!' सिद्धांत एक सेकंद थांबला आणि गोंधळलेल्या पापाराझींकडे पाहिलं, नंतर अभिनेता हात जोडून आत गेला. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धांत आणि नव्या नवेली नंदा हे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु होत्या. हा व्हिडीओ पिंकव्हिला या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सिद्धांत चतुर्वेदी त्याच्या 'फोन भूत' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात ईशान खट्टर आणि कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'फोन भूत' नंतर, अभिनेता अनन्या पांडे आणि आदर्श गौरव सोबत 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसणार आहे. नुकतेच त्याने चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.