Siddharth Chandekar Mother Second Marriage: सिद्धार्थ चांदेकर याच्या आईनं सीमा चांदेकर यांनी यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात दुसरं लग्न केले. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली होती. यावेळी त्यांनी पहिल्यांदा आपल्या या लग्नाविषयी खुलासा केला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. सिद्धार्थ चांदेकरची सध्या बरीच चर्चा रंगलेली आहे. सध्या त्याचा 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतो आहे. 2021 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. आता या नव्या 'झिम्मा 2' ची सर्वत्र चर्चा असून हा चित्रपट सध्या गाजतो आहे. सिद्धार्थ चांदेकरही लहानपणापासून कला क्षेत्रात सक्रिय आहे. सीमा चांदेकरही अभिनेत्री आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या दुसऱ्या लग्नाविषयीचा खुलासा केला आहे. त्या म्हणाल्या, मी अनेक वर्ष एकटी आहे. माझ्या मुलांना मी एकटीने सांभाळलं आहे पण तेव्हा काही वाटायचं नाही कारण सुमेधा आणि सिद्धार्थ माझ्या बरोबरीने उभे होते. आम्ही तिघेही एकमेकांचा खूप मोठा आधार होतो. त्यानंतर सुमेधाचं वेगळं आयुष्य आणि सिद्धार्थ गेल्या काही वर्षात त्याच्या कामात खूपच व्यग्र झाला. त्यात दोन वर्षांपूर्वी माझा एक अपघात झाला. या सगळ्यात मला एकटेपणा जाणवू लागला होता.'' असं त्या म्हणाल्या. 


हेही वाचा : बॉलिवूडच्या कोणत्याही हिरोईननं नाही तर 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीनं पटकावला आंतरराष्ट्रीय पुरस्कार...


पुढे त्यांनी सांगितलं की, ''मी सिद्धार्थला सारखा फोन करायचे पण तो खरंच कामामध्ये खूप व्यग्र असायचा. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. वेळात वेळ काढून तो मला सेटवरून फोन करायचा. एक दिवस सहज मला सिद्धार्थ म्हणाला की, 'आई मला एक स्वप्न पडलेलं त्यात तुझं लग्न होतंय…' 'तू खरंच याबद्दल विचार का करत नाहीस? काय हरकत आहे?', त्याचं ऐकल्यावर मी या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईने विचार केला. लोकं काय म्हणतील? असाही विचार माझ्या डोक्यात होताच पण.. सिद्धार्थनं मला खूप धीर दिला. या सगळ्या गोष्टी मी मितालीशी सुद्धा बोलले. ती मला म्हणाली, ''काकू आता फक्त तू तुझा विचार कर…'' ''तुझ्याबरोबर आम्ही कायम आहोत.'', अशी आठवण त्यांनी स्पष्ट केली. 



''सिद्धार्थ-मिताली आणि सुमेधाशी बोलून मी या सगळ्या गोष्टींवर विचार केला. रितसर विवाह संस्थेत नाव नोंदणी केली. त्यानंतर नितीन म्हसवडे यांच्याशी माझी भेट झाली. ते अकाऊंट्समध्ये काम करतात. अतिशय साधा, सरळ आणि स्वच्छ माणूस. माझं सगळं काही ऐकतात. आता त्यांच्या आई सुद्धा आमच्याबरोबर राहतात. ते दोघंही मला खूप सांभाळून घेतात. आता मला छान वाटतंय. या सगळ्या प्रवासात माझी मुलं कायम माझ्याबरोबर होती.'' असं त्या प्राजंळपणे सांगतात.