कुटुंबासोबत दिवाळीची खरेदी करण्यासाठी अभिनेत्याचा अनोखा फंडा
कोण आहे हा अभिनेता
मुंबई : दिवाळी आणि शॉपिंग हे एक समीकरणच आहे. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत दिवाळीची खास शॉपिंग करत असतं. एकत्र खरेदीला जाणं हा एक वेगळाच आनंद. पण अनेकदा या आनंदाला आपल्या कलाकार मुकतात. लोकप्रियतेमुळे त्यांना कुटुंबासोबत सामान्यांसारखा वेळ घालवता येत नाही. असंच काहीसं या कलाकारासोबत होणार होतं. पण या कलाकाराने एक नामी युक्ती शोधून काढली आहे.
हा अभिनेता आहे आपल्या सर्वांचा सिद्धार्थ जाधव. लालबाग परळ सारख्या परिसरात लहानाचा मोठा झालेला सिद्धार्थ. त्याच्यासाठी या सणांच एक वेगळंच महत्व आहे. अशावेळी शॉपिंग करणं मनात असूनही लोकप्रियतेमुळे जाणं कठीण होतं. अशावेळी सिद्धार्थ एक नाम युक्ती लढवली आहे. सिध्दार्थने चक्क तोंडाला आपला स्कार्फ बांधला. आणि ह्या मास्कमूळे तो आपल्या कुटूंबासोबत मुंबईच्या रस्त्यावर उतरून शॉपिंग करू शकला.
आपल्या मुलाखतीत सिद्धार्थने अनेकदा सांगितलं आहे की, त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. पण लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या अभिनेत्याला आता हे सहज शक्य होतं नाही. पण तरी देखील त्याने हा खास प्रयत्न यंदाच्या दिवाळीला केला आहे.
काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ अगदी अनोख्या पद्धतीने रोहित शेट्टीच्या सिम्बाच्या सेटवर आपला वाढदिवस साजरा केला. त्याच्या या वाढदिवसादिवशी अभिनेता रणवीर सिंहने देखील धमाकेदार डान्स केला. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला होता.