मुंबई : टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या अचानक जाण्यानं सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. हृद्यविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचं निधन झालं. सिद्धार्थाच्या मृतदेहावर ओशिवरा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. सिद्धार्थच्या अंत्यविधीवेळी त्याची गर्लफ्रेंड शेहनाज गिल अगदी कोलमडली होती. स्वत: ला सावरणं शेहनाजला कठीण झालं होतं. सिद्धार्थचं निधन झाला आहे यावर ती विश्वास ठेवू शकत नव्हती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 त्याच्या मृत्यूमुळे चाहते आणि त्याचे सेलिब्रिटी मित्र परिवार देखील खूपच अस्वस्थ झाले. सिद्धार्थ केवळ 40 वर्षांचा होता. त्याचा अखेरचं पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक बाहेर जमले होते. यावेळी शेहनाज गिल देखील उपस्थित होती. शेहनाजचे बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.यात ती अतिशय वाईट स्थितीत रडताना दिसली.


सिद्धार्थच्या निधानानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल हे दोघेही येत्या डिसेंबरमध्ये लग्न करणार होते. शेहनाज गिलच्या जवळच्या एका मित्राकडून ही माहिती समोर आली आहे.


तर दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. नुकतंच हे दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागले होते. सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज या दोघांनी त्यांच्या लग्नाबद्दल कुटुंबियांना सांगितलं होतं.



तर दोघांचे कुटुंबीय देखील त्यांच्या लग्नाच्या तयारीमध्ये व्यस्त होते. मुंबईतील एका हॉटेलसोबतच लग्नासाठीच्या इतर साहित्यांची ही बातचीत सुरू होती. या दोघांच्या लग्नासाठी एकूण 3 दिवसांचे कार्यक्रम आयोजित करण्याचे प्लॅनिंग झालं होतं.