किआरा- सिद्धार्थचा खासगी व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी मिळाली `त्या` प्रश्नांची उत्तरं
ब्रेकअपच्या चर्चांनंतर किआरा- सिद्धार्थच्या प्रेमाचा बोलबाला, खासगी व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी मिळाली `त्या` प्रश्नांची उत्तरं
मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या नात्याच्या चर्चा कायम जोर धरत असतात. काही दिवसांपूर्वी 'शेरशाह' स्टारर अभिनेत्री किआरा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा तुफान रंगली. ब्रेकअपच्या चर्चांनंतर दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. पण आता किआरा आणि सिद्धार्थचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये किआरा आणि सिद्धार्थ एकत्र दिसत आहेत.
खास दिनानिमित्त दोघांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. किआराच्या वाढदिवसा निमित्त सिद्धार्थने एक व्हिडीओ पोस्ट करत आयुष्यातील खास व्यक्तीला शुभेच्छा दिल्या.
व्हिडीओमध्ये सिद्धार्थ आणि किआरामध्ये असलेलं घट्ट नातं दिसून आलं. त्यामुळे दोघांचा खास व्हिडीओ पाहून चाहत्यांना त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ आणि किआरा अद्यापही एकत्र आहेत.. असं म्हणायला हरकत नाही.
दरम्यान, किआराच्या वाढदिवसानिमित्त तिचे आणि सिद्धार्थचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. दोघेही सध्या दुबईमध्ये एकत्र असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
व्हायरल होत असलेल्या फोटोत दोघे एकत्र दिसत नाहीत, पण दोघांचा चाहत्यांसोबत फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सिद्धार्थ आणि किआरा यांनी दोघांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नाही.
किआराचे सिनेमे...
कियाराने 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'लक्ष्मी गुड नवाज', 'कबीर सिंग' आणि 'शेरशाह' यांसारख्या सिनेमांमध्ये आपले अभिनय कौशल्य दाखवलं आहे. यावर्षी अभिनेत्रीचे दोन सिनेमे 'भूल भुलैया 2' आणि 'जुग जुग जिओ' दोना सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली.