सिद्धार्थसाठी ती कियारा नव्हे तर... ; प्रेमानं सर्वांसमोर हाक मारत म्हणाला...
ती पोस्ट आणि सर्व काही समोर..
मुंबई : अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. पण अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉट देखील करण्यात येत. नुकताचं सिद्धार्थने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. सिद्धार्थच्या चाहत्यांनी देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अशात मग कियारा कशी मागे राहू शकते.
कियाराने देखील सिद्धार्थला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कियाराने 'शेरशाह' चित्रपटातील सिद्धार्थसोबत एक फोटो पोस्ट करत 'माझ्या प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा...' असं कॅप्शनमध्ये लिहिलं.
आपल्या खास दिवशी खास व्यक्तीने शुभेच्छा दिल्यानंतर सिद्धार्थने देखील कियाराचे आभार मानले. सिद्धार्थने 'थैंक्स की' असं लिहित लाल रंगाच्या बदामाचा इमोजी शेअर केला. सध्या त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कियाराने सिद्धार्थला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण यावरून कळालं की सिद्धार्थ कियाराला प्रेमात आणि लाडात 'की' म्हणून हाक मारतो.