Sidharth Malhotra-Kiara Advani Marriage Lock Date : बॉलिवूडमध्ये (Bollywood) या वर्षीच अभिनेत्री आलिया (Alia) आणि अभिनेता रणवीर कपूर (Ranveer Kapoor) यांनी विवाह केला. त्यानंतर नुकंतच अली फजल (Ali Fazal) आणि रिचा चढ्ढा (Richa Chhadha) यांचं शानदार लग्न पार पडलं.आता चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी हे कधी लग्न करणार याबद्दल...तर सिद्धार्थ-कियाराच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर सिद्धार्थ-कियारा यांच्या लग्नाचं मुहूर्त ठरला आहे. 


'या' दिवशी अडकणार लग्नबंधनात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार शेरशाह कपल (Shershah couple Marriage december 2022) डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत. या दोघांनी डिसेंबरमधील एक तारीख लॉक केली आहे. शिवाय लग्नानंतर हे दोघे मुंबईत (Mumbai) शाही रिसेप्शन देणार आहेत. सध्या हे दोघे लग्नाच्या तयारीत मग्न आहे. लग्नाची सर्व तयारी झाल्यानंतर सिद्धार्थ-कियारा लग्नाच्या तारखेची घोषणा करणार आहेत. (Sidharth Malhotra-Kiara Advani Marriage december 2022 nmp)


यापूर्वीही लग्नाची 'ही' तारीख आली होती समोर


यापूर्वी सिद्धार्थ-कियारा एप्रिल 023 मध्ये लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. असं म्हटलं जातं की, हे लव्ह बर्ड पहिले कोर्ट मॅरेज करतील आणि नंतर कॉकटेल पार्टी देणार आहेत. हे दोघे नुकतेच करण जोहरच्या दिवाळी पार्टीत दिसले होते. त्यानंतर चाहत्यांना ते लग्न कधी करतात याबद्दल  उत्सुकता होती. त्यात अभिनेता सलमान खानने (Salman Khan) शनिवारी बिग बॉसच्या एपिसोडमध्ये 'थँक गॉड'च्या प्रमोशनसाठी सिद्धार्थ पोहोचला होता. त्यावेळी सिद्धार्थ, लग्नाच्या शुभेच्छा. कियारा तू निर्णय घेतला आहेस... सुंदर निर्णय...अशा शुभेच्छा सलमान खानने दिल्यावर सिद्धार्थ-कियारा लवकरच लग्न करणार हे पक्क झालं.