बॉलिवूडचे हे 5 कपल्स करतात एकमेकांना गुपचूप डेट, पाहा फोटो
चित्रपटसृष्टीत अशी अनेक कपल आहेत जी आजही उघडपणे आपलं नातं सर्वांसमोर ठेवत नाहीत.
मुंबई : चित्रपटसृष्टीत अशी अनेक कपल आहेत जी आजही उघडपणे आपलं नातं सर्वांसमोर ठेवत नाहीत. यात टायगर-दिशापासून अथिया-राहुलपर्यंत अनेक प्रसिद्ध कपलचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कपलबद्दल सांगणार आहोत
अथिया शेट्टी-केएल राहुल
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल बऱ्याच काळापासून एकत्र आहेत. सोशल मीडियावर, दोघंही एकमेकांवरची काळजी व्यक्त करतात, परंतु तसं, ते त्यांच्या प्रेमाबद्दल आणि नात्याबद्दल कधीही उघडपणे बोलत नाहीत.
विकी कौशल-कतरिना कैफ
विकी कौशल आणि कतरिना कैफ देखील बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत. मात्र, दोघंही त्यांच्या नात्याबद्दल पूर्णपणे गुप्तता ठेवतात. जरी दोघांचे एकमेकांच्या घराच्याबाहे अनेक फोटो व्हायरल होत असतात.
सिद्धार्थ मल्होत्रा-कियारा अडवाणी
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही बी-टाऊनची हॉट जोडी आहे. दोघंही बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत आहेत पण या नात्याबद्दल हे दोघंही कधीही उघडपणे बोलत नाहीत.
दिशा पटानी-टायगर श्रॉफ
दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ बद्दल कोणाला माहिती नाही. अनेकदा या दोघांना एकत्र स्पॉट केलं जातं. ते एकत्र वेकशनला जातात याचबरोबर एकत्र फुटबॉल खेळतानाही दिसतात. मात्र, दोघांनीही हे नातं जाहीरपणे स्वीकारलेलं नाही.
आदर जैन-तारा सुतारिया
आदर जैन आणि तारा सुतारिया हे दोघंही एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच, आदरच्या वाढदिवसाला तारा त्याच्या घरी दिसली. दोघांचे एकत्र अनेक फोटो व्हायरल झाले आहेत.