मुंबई : करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट ऑफ द इअर' मधून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आता काही स्टुडंट राहिलेला नाही. सिद्धार्थ त्याच्या सिनेमांसोबतच सध्या चर्चेत आहे तो त्याच्या अफेअरच्या चर्चांमुळे... सिद्धार्थचं नाव अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत जोडलं जातंय. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लिंकअपबद्दलच्या चर्चा होत असताना कियाराने तिच्या मजेशीर अंदाजात प्रेक्षकांच्या या उत्सुकतेला उत्तर दिलं. 'सिद्धार्थ हा माझा बॉयफ्रेंड आहे' असं कियारानं म्हटलं होतं. त्यामुळे सिद्धार्थ आणि कियाराच्या नात्याबद्दलच्या चर्चेनं आणखीनंच जोर धरला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 

बी-टाऊनमध्ये या जोडीच्या अफेयरच्या चर्चा जोर धरत असताना सिद्धार्थला या गोष्टीबद्दल खुलासा करावा लागलाय. कियारा आणि आपलं नातं बॉयफ्रेंड - गर्लफ्रेंडचं नाही तर कियारा ही माझी खूप चांगली मैत्रिण आहे, असं सिद्धार्थ स्पष्ट केलंय. सिद्धार्थ इथेच थांबला नाही तर त्याने कियाराची प्रशंसा करत, 'कियारा एक चांगली अभिनेत्री आहे. सिद्धार्थ माझा बॉयफ्रेंड आहे असं तिनं मस्करीत म्हटलं होतं', असाही खुलासा त्यानं केलंय.


सिद्धार्थ आणि कियारा 'शेरशाह' या चित्रपटात पहिल्यांदा एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. सध्या दोघे चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहेत. 'कबीर सिंग' या चित्रपटात कियारा शाहिद कपूरसोबत दिसली होती. वादग्रस्त ठरल्यानंतरही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.


कियाराने याअगोदर दाक्षिणात्य चित्रपटातही काम केलंय. त्यामुळे कियाराचा चाहता वर्गही मोठा आहे. कियारा आता बॉलिवूडमध्ये स्थिरावतेय असं म्हटलं तर वावगं ठरायला नको.