Sidharth Shukla Death : झोपण्यापूर्वी घेतली होती काही औषध, नंतर उठलाच नाही
रात्री अशी कोणती आणि का घेतली होती सिद्धार्थने गोळी?
मुंबई : बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं वयाच्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. चाहत्यांसाठी सिद्धार्थ शुक्लाची अशी अकाली एक्झिट खूप धक्कादायक आहे. मॉडेल क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये देखील आपलं वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचं असं अकाली जाणं सगळ्यांनाच चटका लावणार आहे.
सिद्धार्थने झोपण्या अगोदर घेतलं औषध
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाने झोपण्यापूर्वी काही औषध घेतली होती. ज्यानंतर तो सकाळी उठूच शकला नाही. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ शुक्लाला हार्ट अटॅक आला. बुधवारी रात्री तो अगदी फिट होता. कोणताच आजार नसताना सिद्धार्थने या जगाचा निरोप घेतला आहे. (Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लाची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट, या लोकांचे मानले आभार)
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच मैत्रिण आणि अभिनेत्री शहनाज गिल शुटिंग सोडून तात्काळ निघाली आहे. शहनाज गिल सिद्धार्थच्या अगदी जवळ होती. काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांसोबत डान्स दिवानेमध्ये परफॉर्म केलं होतं. (धक्कादायक... अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन)
ही पोस्ट ठरली अखेरची
सिद्धार्थ शुक्ला यांचं शेवटची इंस्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. सिद्धार्थ शुक्लाने 24 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याने अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थ शुक्लाने आपला फोटो पोस्ट करत लिहिलं आहे,'सगळ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना धन्यवाद!' तुम्ही तुमचं आयुष्य संकटात टाकता. खूप वेळ तुम्ही काम करता. तुमच्यामुळे रूग्णांना आराम देतो. कुटुंबापासून लांब राहतात. तुम्ही वास्तवात खूप शूर आहात.