मुंबई : सिद्धार्थ शुक्ला Sidharth Shukla चे निधन होऊन 4 दिवस झालेत. 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ शुक्लाने जगाचा निरोप घेतला. सिद्धार्थ शुक्लाच्या अकाली निधनाने सगळेच थक्क झाले आहेत. सिद्धार्थच्या कुटुंबियांसोबतच त्याच्या चाहत्यांना देखील हा मोठा धक्का आहे. सिद्धार्थचे चाहते त्याच्या कुटुंबियांसाठी आणि शहनाज गिलकरता प्रार्थना केली जात आहे. पहिल्यांदाच सिद्धार्थ शुक्लाचे कुटुंबीय त्याच्या निधनानंतर व्यक्त झाले आहेत. 


सिद्धार्थ शुक्लाचे कुटुंबिय असे झाले व्यक्त 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, 'सिद्धार्थच्या आयुष्याच्या प्रवासाचा एक भाग राहिलेल्या आणि त्याच्यावर निःस्वार्थी प्रेम करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. हा प्रवास नक्कीच इथे संपत नाही कारण सिद्धार्थ शुक्ला आता आपल्या सगळ्यांच्या हृदयात कायमचा राहील! सिद्धार्थ त्याच्या गोष्टी खासगी ठेवत असे. आमची अशी विनंती आहे की, या कठीण काळात आम्हाला एकट्यांना सोडा.


सिद्धार्थच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांचे मानले आभार 


सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'मुंबई पोलीस दलाच्या संवेदनशीलता आणि सहानुभूतीबद्दल त्यांचे विशेष आभार. ते ढालीसारखे उभे राहिले. त्या दिवसाच्या प्रत्येक क्षणी आमच्या पाठीशी उभे राहिले, आमची काळजी घेतली आणि आम्हाला वाचवले. आपणा सर्वांना विनंती आहे की सिद्धार्थला आपल्या आठवणी आणि प्रार्थनांमध्ये ठेवा. ओम शांती .... शुक्ला कुटुंब. ' (Sidharth Shukla च्या प्रार्थना सभेत फॅन्सला ही सामिल होता येणार, पाहा कसं?


 



आज संध्याकाळी सिद्धार्थ शुक्लाच्या आत्मशांतीकरता होणार सभा 


आज सिद्धार्थ शुक्लाच्या कुटुंबाने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी संध्याकाळी पाच वाजता प्रार्थना सभा आयोजित केली आहे. ज्यात त्यांचे चाहतेही झूम मीटिंग लिंकद्वारे सहभागी होऊ शकतात. योगिनी दीदी आणि बहीण शिवानी ही प्रार्थना पूर्ण करतील. ब्रह्मा कुमारिस सदस्य आणि दिवंगत अभिनेत्याचे कुटुंबीय देखील उपस्थित राहतील. सिद्धार्थाचे अंतिम संस्कार देखील ब्रह्मकुमारी प्रथेनुसार करण्यात आले.