मुलाच्या मृत्यूनंतर तुटलेली सिद्धार्थ शुक्लाची आई आता असा घालवतेय आपला वेळ
दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला आपल्यातून जाऊन अनेक महिने उलटून गेले आहेत.
मुंबई : बिग बॉस 13 चा विजेता आणि दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लाला आपल्यातून जाऊन अनेक महिने उलटून गेले आहेत. त्यांच्या आकस्मिक निधनाने केवळ चाहतेच नाही तर खास मैत्रिण शहनाज गिललाही मोठा धक्का बसला आहे. मात्र, जर कोणाचं हृदय सगळ्यात जास्त तुटलं असेल तर ती तिची आई आहे. जिचं दु:ख कोणीही शेअर करू शकत नाही.
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर चाहते त्याची आई रिटा यांचं सोशल मीडियावर सांत्वन करताना दिसले. या दुर्घटनेला अनेक महिने उलटून गेले आहेत. पण जेव्हा-जेव्हा अभिनेत्याची आई रीटा कुठेही दिसते. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नेहमीच दुःख असतं. मात्र, आता पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांनाही दिलासा मिळणार आहे. सिद्धार्थची आई रिटाचे अनेक फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती ब्रह्मा कुमारी समर कॅम्पमध्ये दिसत आहे.
येथे ती आश्रमातील मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे. हे फोटो पाहून असं दिसत आहे की, अभिनेत्याची आई नुकतीच मुलांसाठी लावलेल्या समर कॅम्पला पोहोचली होती. आता सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याच्या आईने तिथे घालवलेल्या क्षणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. तसंच तिच्यासाठी प्रार्थना करत आहे. सिद्धार्थची आई स्टेजवर बसून मुलांना टॉफी देत असल्याचंही फोटोत दिसत आहे. याशिवाय ती माईकवर काहीतरी बोलताना दिसत आहे. सोबतच लहान मुलं तिच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेत आहेत.