Sidharth Shukla Death : पाकिस्तानशी काय आहे सिद्धार्थचं नातं, पाहा...

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला
Sidharth Shukla Death : चित्रपट आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर बॉलिवूड इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. इंडस्ट्रीतील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक सिद्धार्थ शुक्लाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा होऊ शकतो यावर अनेकांचा विश्वास बसत नाही.
फक्त भारतीयच नाही तर, पाकिस्तानातही अनेक चाहते सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने खूप दुःखी आहेत. ज्याप्रमाणे भारतामध्ये सर्वच ठिकाणी सिद्धार्थचीच चर्चा सुरु आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानमध्येही ट्विटरच्या टॉप ट्रेंडमध्ये सिद्धार्थचंच नाव आहे. त्याचे पाकिस्तानमधील चाहते सोशल मीडियावर भरपूर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत आहेत.
बिग बॉस 13 नंतर सिद्धार्थ शुक्लाच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. या शोनंतर त्याची जागतिक स्तरावरील फॅन फॉलोइंगही निर्विवादपणे वाढली होती. बिग बॉस आणि यश राज फिल्म्सअंतर्गत मिळालेल्या चित्रपटानंतर सिद्धार्थनं नाव सर्वत्र लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलं.
सिद्धार्थच्या मृत्यूवर पाकिस्तानी पत्रकारानं दिलेल्या माहितीनुसार हा भारतीय कलाकार पाकिस्तानमधील टॉप ट्रेंड आहे. सोशल मीडियावर एका पाकिस्तानी युजरनं लिहिलं, की आयुष्य कधीही हाताबाहेर जाऊ शकते. पुढे काय होणार आहे याची आम्हाला कल्पना नाही. आयुष्याची काहीच हमी नाही आणि मृत्यूचीही, पण असं असतानाही आम्ही जीवनासाठी योजना बनवत राहतो. किती हा विरोधाभास...
शहनाजही पाकिस्तानात ट्रेंडमध्ये
फक्त सिद्धार्थच नाही, तर शहनाज गिल ही सिद्धार्थची कथित प्रेससी देखील पाकिस्तानमध्ये ट्रेंड करत आहे. सिद्धार्थ आणि शहनाजची जोडी बिग बॉस शोमध्येच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेऊन गेली होती. सिद्धार्थ आणि नाझच्या लाइव्ह सेशनचे चित्र टाकताना एका पाकिस्तानी चाहत्याने सांगितले की, हे त्यांचे पहिले आणि शेवटचे लाइव्ह सेशन होते यावर माझा विश्वास बसत नाही.