Sidharth Shukla Death: बिग बॉस (Bigg Boss) फेम अॅक्टर सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याच्या निधनानंतर त्याच्या अनेक आठवणी विविध स्तरांतून शेअर करण्यात येत आहेत. यामध्ये सर्वाधिक शेअर केली जाणारी आणि विचार करायला भाग पाडणारी पोस्ट आहे सिद्धार्थचं एक ट्विट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थचं हे ट्विट सर्वाधिक शेअर होण्याचं कारण म्हणजे यामध्ये त्यानं मृत्यूबाबत मांडलेले विचार. त्यानं 24 ऑक्टोबर 2017 रोजी दुपारी 2.33 वाजता केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिलं, 'मृत्यू हे आयुष्यातील सर्वात मोठं नुकसान नाही. तर, आपण जगताना आपल्यामधील कोणते गुण मरण पावतात, यात मोठं नुकसान आहे'. सिद्धार्थनं हे ट्विट केलं तेव्हा त्याच्या मनात नेमकी कोणत्या भावनांची कालवाकालव सुरु होती, हाच प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. 


सिद्धार्थचं हे ट्विट व्हायरल होताच, त्यावर पुन्हा एकदा चाहत्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. सिद्धार्थचे हे विचार काही वर्षांपूर्वीचे असले, तरीही त्यात मोठा गंभीर अर्थ दडलेला आहे हेच स्पष्ट होत आहे. 


Sidharth Shukla Death: सिद्धार्थ शुक्लानं त्याच्या आईविषयी जे म्हटलंय ते ऐकून तुम्हाला रडू येईल 



आयुष्यावर भरभरुन प्रेम करा, प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घ्या, असं म्हणत नेटकरी आणि चाहते सिद्धार्थच्या या ट्विटवर व्यक्त झाले. काही चाहत्यांनी हे ट्विट वाचून सिद्धार्थला श्रद्धांजली दिली आणि त्याच्या नसण्याचं दु:ख व्यक्त केलं. 


दरम्यान, टेलिव्हीजन आणि चित्रपट जगतातील एक प्रसिद्ध चेहरा, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन झाल्याचं धक्कादायक वृत्त गुरुवारी समोर आलं. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्याचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे.