Sidhu Moosewala Mother Pregnancy Latest News: दिवंगत पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला याचे वडिल बलकौर सिंह यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळं मुसेवालाच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सिद्धु मुसेवालाची आई गरोदर असल्याची चर्चा समोर आली होती. मात्र, आता बलकौर सिंह यांच्या पोस्टमध्ये पत्नी चरण कौर खरंच गरोदर आहे का असा सवाल उपस्थित होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धु मुसेवाला याच्या वडिलांनी केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, कुटुंबाबाबत खूप साऱ्या अफवा रंगत आहेत. पण या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, असं त्याने म्हटलं आहे. अनेक जण त्यांच्या या पोस्टचा संबंधी त्यांच्या पत्नीच्या गरोदरपणाच्या विषयाशी जोडत आहे. काही दिवसांपूर्वीच समोर आलेल्या रिपोर्टनुसार, सिद्धु मुसेवाला याच्या निधनानंतर त्याचे आई-वडिल एकटे पडले होते. अशावेळी आयव्हिएफच्या मदतीने सिद्धूची आई वयाच्या 58व्या वर्षी गरोदर राहिली असून ती लवकरच जुळ्या मुलांना जन्म देऊ शकते. 


सिद्धु मुसेवालाची आई गरोदर असल्याच्या चर्चा असतानाच त्याच्या वडिलांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी चाहत्यांना अफवा पसरवू नका, अशी विनंती केली आहे. ते पोस्टमध्ये लिहतात की, आम्ही सिद्धुच्या चाहत्यांचे आभारी आहोत. जे आमच्या कुटुंबाच्या बाबतीत चिंतेत आहेत. मात्र आम्ही तुम्हाला आवाहन करतो की कुटुंबाच्याबाबतीत खूप साऱ्या अफवा रंगल्या आहेत. त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 


सिद्धु मुसेवाला यांच्या वडिलांनी पुढे पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जी काही माहिती किंवा बातमी असेल ती कुटुंबातील सदस्यच स्वतः सगळ्यांसोबत शेअर करतील. या पोस्टनंतर सिद्धुच्या चाहत्यांना अजूनही अपेक्षा आहेत की लवकरच काही गुड न्यूज ऐकायला मिळणार आहे. 


11 मार्च रोजी समोर आले होते की, चरण कौर यांना डिलिव्हरीसाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पंजाब केसरीच्या एका रिपोर्टमध्ये असंही म्हणण्यात आलं आहे की, त्या जुळ्या मुलांना जन्म देणार आहे. मात्र, सिद्धु मुसेवालाच्या वडिलांनी केलेल्या पोस्टनंतर चाहते संभ्रमात आहेत. चरण कौर खरंच गरोदर आहेत का? असाही सवाल उपस्थित होत आहे. 


29 मे 2021 साली मानसाच्या जवाहर गावात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला त्याच्या जीपमध्ये बसला असतानाच काही जण दुसऱ्या गाडीतून येऊन त्यांनी जीपवर गोळ्या चालवल्या. या हल्ल्यातच त्याचा मृत्यू झाला. सिद्धु मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लाँरेन्स बिश्नोई गँगने घेतली होती. मुलाच्या हत्येनंतर बलकौर सिंह आणि चरण कौर या दोघांना मोठा मानसिक धक्का बसला होता.