अभिनेत्रीच्या आईचा अपघात, 9 वर्षांच्या मुलावर FRI दाखल.. नक्की काय आहे प्रकरण?
अभिनेत्रीच्या आईचा अपघात, म्हणून 9 वर्षांच्या मुलावर तक्रार... नक्की काय आहे प्रकरण?
मुंबई : गोरेगावच्या वनराई पोलिसांनी 9 वर्षांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. लहान मुलाविरोधात तक्रार दाखल करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री सिमरन सचदेवा आहे. सिमरनने सांगितले की, 9 वर्षांच्या मुलाने तिच्या आईला सायकलने धडक दिली, त्यामुळे अभिनेत्रीता खाली पडली... याच कारणामुळे अभिनेत्रीने 9 वर्षांच्या मुलावर तक्रार दाखल केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने तिच्या तक्रारीत सांगितल्या प्रमाणे, अपघात 27 मार्च रोजी गोरेगाव पूर्व येथील नेस्कोच्या शेजारी लोढा फिओरेन्झा भागात झाला होता. त्यावेळी अभिनेत्रीची 62 वर्षीय आई संध्याकाळी फिरायला निघाली होती.
यादरम्यान सायकल चालवत असताना 9 वर्षांच्या मुलाने अभिनत्रीच्या आईला धडक दिली. ज्यामुळे आई खाली पडली. सिमरनची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आईची प्रकृती अद्यापही स्थिर नसल्याचं देखील अभिनेत्रीने सांगितलं आहे.
तर दुसरीकडे पोलिसांना लहान मुलांवर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं बाल कल्याण समितीने सांगितलं आहे. यावर सिमरन म्हणाली, मुलावर नाही तर त्याच्या पालकांवर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
या प्रकरणी एका मुलाखतीत बोलताना सिमरण म्हणाली, मी केस दाखल केली होती, पण मुलावर नव्हे तर त्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल व्हायला हवा होता.
पुढे अभिनेत्री म्हणाली, 'माझी आई गेल्या काही महिन्यांपासून अंथरुणावर आहे. घटनेनंतर मुलाच्या आईने फक्त एक मेसेज करून माफी मागितली. पण ज्या ठिकाणी ज्येष्ठ व्यक्ती संध्याकाळी फिरत असतात, अशा वेळेत मुलांना सायकल चालवण्या परवानगी कशी देऊ शकतात... ' असा प्रश्न सिमरनने यावेळी उपस्थित केला.
सिमरनच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 'छोटी सरदारनी', 'नागिन 3' आणि 'सुपरकॉप्स Vs सुपरव्हिलेन्स' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसली.