मुंबई : बिग बॉस 15 ची तयारी जोरात सुरू आहे.  स्पर्धक देखील फाईनल झाले आहेत. पण बिग बॉसच्या घरात बराच वेळ घालवणं प्रत्येकालाच जमत असं नाही. बिग बॉसच्या घरात अनेक प्रकारच्या तणावातून जावं लागतं. कधीकधी वातावरण हाताबाहेर जातं. पंजाबी गायिका अफसाना खान देखील बिग बॉस 15 मध्ये दिसणार होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफसाना खानने सलमान खानच्या शोमधून तिचं नाव मागे घेतलं आहे. शो संबंधित सूत्रांनी सांगितलं की, बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल अफसाना खान खूप तणावात होती. यामुळे तिने पंजाबला परतण्याचा निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे, अफसाना खानच्या या हालचालीने त्याच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसला असेल.


सांगितलं जात आहे की, तिला काल संध्याकाळी पॅनीक अटॅक आला. याचं कारण होतं बिग बॉसबद्दलचा ताण. यानंतर, शोच्या निर्मात्यांनी तिला आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील पुरवल्या. पण अफसाना खानने पॅनीक अटॅकनंतर शोमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती पंजाबला रवाना झाली.


पंजाबी गायिकेने बिग बॉस 15 चा प्रोमो शूट केला होता. काही काळ तिला मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. अफसाना खान तिच्या 'यार मेरा तितलीयन वर्गा' या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आली. अफसाना खानचं हे गाणे खूप आवडलं.