`कबीर सिंग` फेम अभिनेत्री गायक जुबिनसोबत अडकणार विवाहबंधनात?
गायक जुबिन नौटियालच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे.
मुंबई : गायक जुबिन नौटियाल आणि 'कबीर सिंग' फेम निकिता दत्ता यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा आहे. आता अशी बातमी आहे की, जुबिन आणि निकिताचे कुटुंबही एकमेकांना भेटले आहे.
रिपोर्टनुसार, निकिता नुकतीच उत्तराखंडमधील जुबिनच्या गावी गेली होती. तर जुबिन लग्नाच्या आयोजनासाठी आणि निकिताला भेटण्यासाठी मुंबईत आला होता.
जुबिन आणि निकिता याआधीही अनेक प्रसंगांमध्ये एकत्र दिसले आहेत. दोघेही डिनर डेटवर दिसले आहेत. अनेकदा रोमँटिक लोकेशन्सवर ते एकत्र स्पॉट झाले आहेत.
जुबिन नौटियाल आणि निकिता दत्ता यांनी अद्याप त्यांचे नाते अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. मात्र या दोघींच्या वारंवार एकत्र येण्यामुळे हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची शंका चाहत्यांना आहे.
दोघांमध्ये काय चालले आहे, असा प्रश्न सर्वजण विचारत आहेत. दोघांच्या नात्याची अटकळ तेव्हा सुरू झाली जेव्हा दोघे एका रेस्टॉरंटमध्ये डेटवर अनेक वेळा दिसले.
निकिता दत्ता आणि जुबिन एकत्र विमानतळावर देखील स्पॉट झाले आहेत. ती जुबिनला घरी नेण्यासाठी गाडी घेऊन पोहोचली होती. नंतर निकिताच्या पोस्टने दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे संकेत दिले.
निकिताची ही पोस्ट उत्तराखंडशी संबंधित होती, जे जुबिनचं गाव आहे. दोघेही एकमेकांच्या सोशल मीडिया पोस्टवर अनेकदा कमेंट करतात. यामुळे, चाहत्यांना विश्वास आहे की लवकरच ते दोघांचे मोठे पारंपारिक लग्न करू शकतात.