#ArrestJubinNautyal : काही दिवसांपूर्वीच गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) याच्या आगामी शोमुळं त्याच्यावर अनेकांचाच रोष ओढावला. जुबिनविरोधात उठवल्या गेलेल्या आवाजामुळं त्याला अटक करण्याची मागणी करणाऱ्यांची संख्याही वाढली. पाहता पाहता सोशल मीडियावर #ArrestJubinNautyal असा हॅशटॅग ट्रेंडमध्ये आला. जुबिन ज्या कार्यक्रमात गाणार होता, त्याचा आयोजक एक गुन्हेगार असल्याची बाब हेरत त्याला कडाडून विरोध करण्यात आला. काहींनी तर, या गायकाला देशद्रोही (anti National) म्हणत हिणवलंसुद्धा. आता या संपूर्ण प्रकरणावर खुद्द जुबिननंच प्रतिक्रिया दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुबिननं स्पष्ट केल्यानुसार त्याचा कार्यक्रम रद्द झालेला नाही. याव्यतिरिक्त आणखी एका मुद्द्याकडे त्यानं लक्ष वेधत आपल्यावर ओढावलेलं संकट किती मोठं आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. माध्यमांशी संवाद साधताना आपल्या आईलाही या सर्व परिस्थितीमुळं किती त्रास सहन करावा लागत आहे, हे वास्तव त्यानं मांडलं. 


आपल्याविरोधातील या सर्व वातावरणाचा थेट परिणाम आईवर होत असल्याचं त्यानं सांगितलं. पोटच्या मुलाला देशद्रोही म्हणत त्याला विरोध केला जात आहे, हे पाहून जुबिनची आई नैराश्याचा (Depression) शिकार होऊ लागली आहे. आईची ही अवस्था चिंतेत टाकणारी असल्याचाच सूर जुबिनच्या बोलण्यातून नकळत व्यक्त झाला. 


वाचा : 'माझं देशावर...', #ArrestJubinNautyal ट्रेंडनंतर जाणन घ्या, नेमकं काय घडलं?


कित्येक वर्षांपासून आपण करत असलेल्या मेहनतीवर या सर्व वातावरणामुळं गालबोट लागल्याचं म्हणत त्यानंही नाराजी व्यक्त केली. आपली आई, नैराश्याचा सामना करत असल्याचं सांगत Paid Twitter thread मुळं ही ठिणगी पडल्याचं तो म्हणाला. मी देशद्रोही कसा? हा खडा सवालही त्यानं यावेळी सर्वांपुढे मांडला.