Kailash Kher Angry: कैलाश खेर ही लोकप्रिय हिंदीतले गायक आहेत. त्याची अनेक हिंदी गाणी ही प्रसिद्ध आहेत. बॉलिवूडमधील संगीत परंपराही खूप जूनी आहे. बॉलिवूडचे लोकप्रिय गायक हे आपल्या चाहत्यांसाठीही अनेकदा लाईव्ह शो करताना दिसतात. त्यांच्या या कार्यक्रमांनाही चाहते गर्दी करतात. अनेकदा लहान मोठ्या नामांकित कार्यक्रमांनाही (Kailash Kher Video) ते हजेरी लावतात. त्यामुळे हिंदीतल्या बॉलिवूडच्या गायकांचा चाहतावर्ग हा खूपच मोठा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलाश खेर  (Khelo India) हे त्यातलेच एक आहेत. त्यांचा असाच एक कार्यक्रम होता जेव्हा प्रेक्षकांनी, चाहत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली होती. परंतु पुढील काही मिनिटांमध्ये झालं असं काही की कैलाश खेर यांचा ताबा सुटला आणि रागाच्या भारात नको नको ते बोलून बसले. 


कैलाश खेर यांच्यामुळे उत्तर प्रदेश येखील 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स' चर्चेत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 25 मेला याचे उद्धाटन केले होते. यावेळी लखनऊ येथे कार्यक्रमाचे मोठे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी कैलाश खेर येथे उपस्थित होते. परंतु येथील आयोजकांची (Kailash Kher News) त्यांनी चांगलीच शाळा घेतली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कैलास खेर यांचा संयम इतका सुटला आहे की ते रागाच्या भरात जोरजोरात ओरडू लागले आहेत. त्यामुळे नक्की असं काय घडलं की यावेळी ते भर कार्यक्रमात इतके चिडले. 


हेही वाचा  - '...विचार करतो मी कुणाचा मुलगा आहे', वडीलांच्या जयंतीनिमित्त रितेशची पोस्ट वाचून तुमचंही मन गहिवरेल!


समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की, त्यांना या कार्यक्रमात बोलवण्यात आले होते आणि यावेळी त्यांना या कार्यक्रम ठिकाणी पोहाचायला उशीर झाला. त्यांना ट्रॅफिक जाममुळे एक तास उशीर झाला. त्यातून ते आयोजकांवरच भडास काढू लागले. ''आपल्या हुशारी दाखवतायत त्यापुर्वी तुम्ही जरा शिस्त राखा... एक तास मला वाट पाहायला लावली. काय आहे हे खेलो इंडिया? कुणालाच काम करणं जमतं नाही तर बोलून टाका नाही करायचे मग आम्हीही सोडून देऊ.''


त्यापुढे ते म्हणाले की, ''खेलो इंडिया तेव्हा आहे जेव्हा आम्ही आनंदी असू, आमच्या घरचे आनंदी असतील तर बाहेरचे आनंदी राहतील. त्यावेळी त्यांनी आपला परफॉर्मन्सही पुर्ण केला आणि सोबतच म्हणाले की, जर तुम्ही मला इथे परफॉर्म करायला बोलावलंय तर पुढचा पुर्ण एक तास हा माझा आहे. मी माझ्या देशाची आणि देशवासियांची पूजा करतो. पण व्यवस्थापन नीट असायला पाहिजे. नाहीतर कार्यक्रम वाईट होऊ शकतो.'' 



त्यानंतर स्वत: कैलाश खेर यांनी ट्विटवर एक पोस्टही शेअर केली आहे. ज्यात त्यांचा एक व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते त्यांच्या परफॉर्मन्स एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळी त्यांनी पतंप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचेही कौतुक केले आहे.