लतादीदींच्या प्रकृतीसंदर्भात दिलासादायक बातमी, कुटुंबियांनी दिली महत्त्वाची माहिती
Lata Mangeshkar Health Update: ICU मध्ये उपचार घेणाऱ्या लतादीदींच्या हेल्थ संदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन घरी परताव्यात यासाठी सर्वजण मनोभावे प्रार्थना करत आहेत. लतादीदींच्या हेल्थसंदर्भात एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
लतादीदींची तब्येत हळूहळू सुधारत असल्याचे डॉक्टरांचं म्हणणं आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर सतत नजर ठेवून आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर प्रतीत सामदानी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना व्हेंटिलेटरवर सपोर्ट काढण्यात आला आहे. सध्या त्या आयसीयूमध्ये असून डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. लतादीदींसाठी बॉलिवूडच नाही तर सर्व स्तरावर त्या लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी प्रार्थना करत आहे.