नेहा कक्करच्या `याद पिया की आने लगी` गाण्याची यूट्यूबवर धूम
`याद पिया की आने लगी` गाणं टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आलं आहे.
मुंबई : बॉलिवूडची रिमिक्स क्विन बनलेल्या गायक नेहा कक्करचं (Neha Kakkar)'याद पिया की आने लगी' (Yaad Piya Ki Aane Lagi) गाणं सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. या गाण्याच्या व्हिडिओलाही अनेकांची पसंती मिळत आहे. हे गाणं रिलीज होऊन जवळपास २० दिवस झालेले असताना गाण्याला तब्बल १०० मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.
१६ नोव्हेंबर रोजी टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर 'याद पिया की आने लगी' गाणं रिलीज झालं. रिलीज झाल्याच्या काही वेळात गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं. दोन दिवसांतच गाण्याला २२,०६९,४१६ वेळा पाहण्यात आलं होतं. आता या गाण्याने १०६,२७०,१७६ या संख्येचा आकडा पार केला आहे. 'याद पिया की आने लगी' गाण्याला नेहा कक्करने आवाज दिला असून दिव्या खोसला कुमारने यात अभिनय केला आहे.
फाल्गुनी पाठक यांच्या 'याद पिया की आने लगी' या गाण्याचं हे रीक्रिएट व्हर्जन आहे. तनिष्क वागची यांनी गाण्याला संगीत दिलं आहे. तर जानीने या गाण्याचं शब्दांकन केलं आहे. 'याद पिया की आने लगी' रिक्रिएट व्हर्जन राधिका राय आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शन केलं आहे.