मुंबई : कलाकार नेहमीच त्यांच्या डेली लाईफमधील हॅपी मुव्हमेंट चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतात. कधी नव्या प्रोजेक्टची बातमी, तर कधी आपल्या फॅमिलीसोबत वेळ घालवतानाचे गोड क्षण ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.मराठमोळी गायिका प्रियांका बर्वेचा देखील इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते. आपल्या गोड आवाजातील व्हिडिओ ती इंस्टाग्रामवर शेअर करताना दिसते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा ती घरी असताना छोट्या युवानसोबत देखील गाण्याचा सराव करताना दिसून येते.  प्रियांका आणि चिमुकल्या युवानचे व्हिडिओ सगळ्याचंच लक्षवेधून घेणारे असतात. स्टार आई आणि मुलाची केमिस्ट्री या व्हिडिओंमध्ये नेहमीच पाहायला मिळते.



नुकताच संतूर मॉम प्रियांकाने शेअर केलेल्या एका व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या व्हिडिओत प्रियंका आपल्या मुलाला कुशीत घेऊन गाण्याचं रेकॉर्डिंग करताना दिसतेयं. बाळाला थापटत ती गाण्याचं रेकॉर्डिंग पुर्ण करताना दिसतेय. 


एक आई आणि गायिका अशा दोन्ही भूमिका एकत्र सांभाळत प्रियांकाने आपल्या गाण्याचं रेकॉर्डिंग पर्ण केलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर सेलिब्रिटींनी ही तिचा व्हिडिओ शेअर करत या स्टार आईचं कौतुक केलं आहे.
 
प्रियांकाने याआधी देखील युवानला जवळ घेऊन आपल्या गाण्याचा रियाज करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यामुळे इवल्याशा वयात युवान देखील आईकडून न कळत का होईना गाण्याचं प्रशिक्षण घेतोय असंच म्हणावं लागले. 
मागील वर्षी प्रियांकाने युवानला जन्म दिला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर प्रियांका शेअर करत असलेल्या व्हिडिओंमुळे आई आणि मुलाच्या केमिस्ट्रीला नेहमीच पसंती मिळताना दिसून येते .